पुण्यात पूर ओसरला; पण घरांमध्ये गाळ, चिखलाचं साम्राज्य; CM शिंदेंचे यंत्रणेला महत्त्वपूर्ण आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 03:28 PM2024-07-26T15:28:19+5:302024-07-26T15:29:38+5:30

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाची दखल घेऊन सुमित कंपनी ५०० स्वच्छता कर्मचारी आणि बीव्हीजी कंपनी १०० सफाई कर्मचारी उपलब्ध करून देणार आहे.

Flood recedes in Pune But the sludge mud in the houses CM eknath Shinde important orders to the system | पुण्यात पूर ओसरला; पण घरांमध्ये गाळ, चिखलाचं साम्राज्य; CM शिंदेंचे यंत्रणेला महत्त्वपूर्ण आदेश

पुण्यात पूर ओसरला; पण घरांमध्ये गाळ, चिखलाचं साम्राज्य; CM शिंदेंचे यंत्रणेला महत्त्वपूर्ण आदेश

CM Eknath Shinde ( Marathi News ) :पुणे शहरासह आसपासच्या भागात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचायनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरलं आहे. या घरांमधील चिखल, गाळ आणि कचऱ्याची महापालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. 

पुरामुळे घरांचे, शेतीचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. पुण्यातील सिंहगड रोड, संचयनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरामध्ये चिखल शिरला आहे. त्यामुळे याभागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून त्याची त्वरित दखल मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली असून जिल्हा प्रशासनाला डीप क्लीन मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

घरांमध्ये शिरलेल्या पुराच्या पाण्यामुळे झालेला चिखल साफ करण्यासाठी सुमित इंटरप्राईजेस आणि बीव्हीजी या खासगी स्वच्छता कंपन्यांची मदत घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाची दखल घेऊन सुमित कंपनी ५०० स्वच्छता कर्मचारी आणि बीव्हीजी कंपनी १०० सफाई कर्मचारी उपलब्ध करून देणार असून त्यांच्या माध्यमातून घरांमधील चिखल काढून साफसफाई करण्यात यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, पुराचे पाणी, चिखल यामुळे परीसरात रोगराई पसरू नये यासाठी महापालिका प्रशासनाने औषधांची फवारणी करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

Web Title: Flood recedes in Pune But the sludge mud in the houses CM eknath Shinde important orders to the system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.