Join us

न्यायालयीन चौकशी समितीकडून झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 4:59 AM

अग्नी सुरक्षेचे नियम मोडून निष्पाप जिवांशी खेळणाऱ्या मुंबईतील उपाहारगृहांचे वास्तव समोर आणणाºया कमला मिल आग प्रकरणाची न्यायालयीन चौकशी

मुंबई : अग्नी सुरक्षेचे नियम मोडून निष्पाप जिवांशी खेळणाऱ्या मुंबईतील उपाहारगृहांचे वास्तव समोर आणणाºया कमला मिल आग प्रकरणाची न्यायालयीन चौकशी समितीमार्फत झाडाझडती सुरू झाली आहे. एफएसआय घोटाळा, अनियमितता आढळून आलेल्या या प्रकरणात महापालिका व अग्निशमन अधिकाºयांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी न्यायालयामार्फत नेमण्यात आलेल्या समितीने शनिवारी दुर्घटना स्थळाची पाहणी केली. चौकशीचा अहवाल ३१ आॅगस्टपर्यंत न्यायालयाला सादर करण्यात येणार आहे.कमला मिल परिसरातील वन अबव्ह व मोजो बिस्ट्रो या दोन रेस्टो पबला गेल्या वर्षी २९ डिसेंबरच्या मध्यरात्री आग लागली होती. त्यामध्ये १४ जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाने निवृत्त मुख्य न्यायमूर्ती ए. व्ही. सावंत यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समिती स्थापली होती. त्यामध्ये वास्तुविशारद वसंत ठाकूर, पालिकेचे माजी आयुक्त के. नलीनाक्षन यांचा समावेश आहे.त्रिसदस्यीय समितीने केलेले निरीक्षणत्रिसदस्यीय समितीने कमला मिलमधील घटनास्थळाला शनिवारीभेट दिली. समिती सदस्यांनी घटना स्थळाची पाहणी अर्धा ते पाऊणतास केली.आगीची घटना घडली तेव्हा बाहेर पडण्याचा मार्ग न भेटल्याने मृत्यूचा आकडा वाढल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.याची सत्यता पडताळण्यासाठी समिती सदस्यांनी पबकडे लिफ्टने जाऊन खाली उतरताना पायºयांचा वापर केला.या वेळी पालिकेचे उपायुक्त (सुधार) चंद्रशेखर चौरे, जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्रकुमार जैन तसेच स्थानिक पोलीस अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :कमला मिल अग्नितांडव