Join us

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत कोसळधारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 3:53 PM

मुंबईत सरासरी ६० मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली.

ठळक मुद्देशहर २७.४१पूर्व उपनगर ३७.१८पश्चिम उपनगर ३५.९८

मुंबई : सोमवारी मुंबईत १००.७ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली असतानाच मंगळवारी सकाळी ८ वाजता मुंबईत सरासरी ६० मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. आणि आता १ ऑगस्टपासून कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे देखील पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

पावसाने मुंबईला धू धू धुतले असतानाचा आता हवामान खात्याकडील माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मुंबई व परिसरात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. काही ठिकाणी ढगाळ आकाश होते. पुढच्या २४ ते ४८ तासांत मुंबई आणि ठाण्यात मध्यम ते जोरदार पाऊसाची शक्यता आहे. पुढच्या ४८ तासांत मराठवाडा व लगतच्या परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

.........................

रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये येत्या ५ दिवसांत मुसळधार पाऊस पडेल. मुंबईत २४ तासांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पावसाचा जोर कायम राहील.

- शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग

.........................

 

कुलाबा ५७.२सांताक्रूझ २८.६

........................

सकाळी ८ ते १० या वेळेत मुंबई शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी १० ते १५ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली.

........................

सकाळी १० नंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली. बहुतांश ठिकाणी हवामान ढगाळ होते. मात्र पाऊस बेपत्ता होता. पावसाने मोकळीक दिल्याने घरात बसलेले मुंबईकर पुन्हा मोठ्या संख्येने बाहेर पडले होते. शिवाय पावसाने कमी झालेली वाहतुकीची रहदारी पुन्हा वेगवान झाली होती. सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेर्यंत देखील पाऊस बेपत्ता होता. दुपारी साडे बारा नंतर मुंबईत पुन्हा पावसाची रिमझिम सुरू झाली होती. या काळात ७ ठिकाणी झाडे पडली. तर एका ठिकाणी शॉर्ट सर्किट झाले. 

.......................

 

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटमुंबईमानसून स्पेशलपाऊस