Join us

गणेशोत्सवानिमित्त फुले महागली

By admin | Published: September 16, 2015 11:20 PM

गणेशोत्सवानिमित्त फुलांचे भाव वाढले असून सजावटीसाठी लागणारी जरबेरा ,आॅर्कीड, पायनागल ही फुले कोलकता, मद्रास, बंगळुरू येथून तर वसई येथून चाफा, सोनटक्का

ठाणे : गणेशोत्सवानिमित्त फुलांचे भाव वाढले असून सजावटीसाठी लागणारी जरबेरा ,आॅर्कीड, पायनागल ही फुले कोलकता, मद्रास, बंगळुरू येथून तर वसई येथून चाफा, सोनटक्का, व लाल जास्वंदाची आवक मोठ्याप्रमाणात होत आहे. त्यांच्या खरेदीसाठी भक्तांनी बाजारात गर्दी केली आहे. तसेच जास्वंद, दुर्वा, केवडा आणि शमीच्या पानांनाही मागणी आहे. दुर्वांची एक जुडी १०-१५ रुपयाला मिळत आहे. गणेशोत्सवाचा काळ हा फुलविक्रेत्यांचा कमविण्याचा मोसम असल्याने फुलांचे भाव वाढले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दीड दिवसाचे गणपती असणाऱ्या काही गणेश भक्तांनी खऱ्या फुलांचे मखर बनविण्यासाठीििवक्रेत्यांना आॅर्डर दिली आहे. यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते. भाव कडाडले-मागील आठवड्यात ४००-५०० रुपये किलोने मिळणारा निशीगंध ६००-७०० रुपये किलोने विकला जात आहे. गावठी गुलाब६०-७० रुपये डझनाने तर कलकता गोंडा १०० रुपये किलो या दराने बाजारात उपलब्ध आहे. मोगऱ्याच्या एका गजऱ्याची किंमत २० रुपये आहे तर वेणीची किंमत २०-३० रुपये असून गौरीच्या दिवशी चांगली सजवलेली वेणी घ्यावयाची असेल तर ६०-७० रुपये सवाष्णींना मोजावे लागणार आहेत. फुलेया आठवड्यातील भावमागील आठवड्यातील भाव..वसई मोगरा १००० रुपये किलो५०० रुपये किलो निशीगंध ६००-७०० रुपये किलो४००-५०० रुपये किलोपिवळा गोंडा १००-१५० रुपये किलो५०-६०रुपये किलोकलकत्ता गोंडा१००-१५० रुपये किलो५०-६० रुपये किलोसोनचाफा८००-१००० रुपये शेकडा२००-४०० रुपये शेकडाजरबेरा१०० रुपये (जुडी)४० रुपये (जुडी)शेवंती५००-६०० रुपये किलो ४०० रुपये किलो लिली५० रुपये (जुडी)२० रुपये (जुडी)अष्टर४०० रुपये शेकडा२०० रुपये शेकडा तगर६००रुपये (जुडी)३००रुपये (जुडी)