Join us

तुमची त्वचा निरोगी ठेवणारी फुले

By admin | Published: June 22, 2017 2:22 AM

बर्गमोट हे तुम्हाला सर्वाधिक ताजेतवाने करणारे फूल आहे. त्यातील सायट्रसचा सुगंध तुम्हाला ताजातवाना तर करतोच, पण त्यात तुमच्या त्वचेची निगा राखणारेही गुणधर्म आहेत

- अमित सारडा, वेलनेस अ‍ॅण्ड ब्युटी एक्स्पर्ट

बर्गमोट बर्गमोट हे तुम्हाला सर्वाधिक ताजेतवाने करणारे फूल आहे. त्यातील सायट्रसचा सुगंध तुम्हाला ताजातवाना तर करतोच, पण त्यात तुमच्या त्वचेची निगा राखणारेही गुणधर्म आहेत. बर्गमोटपासून काढलेल्या तेलात जंतुनाशक, जीवाणुनाशक गुणधर्म आहेत, त्याशिवाय त्यात तुम्हाला आराम देण्याची क्षमता आहे. यात तुमच्या त्वचेची काळजी घेण्याचे अनेक गुणधर्म आहेत. त्वचेवरील डाग, चट्टे दूर करण्याचे घटक आहेत. त्यामुळे तुमच्या त्वचेचा पोत अधिक नितळ आणि उजळ होतो. त्याशिवाय त्यात दुर्गंधी दूर करण्याचे घटक आहेत. शरीराच्या दुर्गंधीला कारणीभूत ठरणाऱ्या जंतूंपासून तुमची सुटका होते. बर्गमोट तेलापासून होणारे लाभमन शांत करते.त्वचेचा दाह कमी करते.बुरशीमुळे होणाऱ्या संसर्गापासून रक्षण करते.बर्गमोट तेल हे हलके पिवळ्या-हिरव्या रंगाचे असते. त्यात अपायनिन, मायरसिन, लिमोनिन, ए-बर्गप्टीन, बी - बिसाबोलिन, लिनालूल, लिनाइल एॅसिसेट, नेरॉल, नेरील एॅसिसेट, जेरानिओल, जेरानिओल एॅसिटेट आणि ए - टर्पिनिओल हे रासायनिक घटक आहेत. झेंडू चमकदार केशरी रंगाची झेंडूची फुले सर्वांनाच माहीत आहेत. झेंडूच्या फुलात असलेल्या बरे करण्याच्या गुणधर्मामुळे ती हजारो वर्षांपासून ओळखली जातात. झेंडूच्या फुलामुळे त्वचेचा दाह, लाली कमी होते. थकलेल्या स्नायूंना विश्रांती मिळते. बुरशीच्या संसर्गामुळे येणारी सूज, जळजळ यापासून आराम मिळतो. यातल्या अँटीआॅक्सिडंट्स गुणधर्मामुळे फ्री रॅडिकल्स तसंच हानिकारक कणांमुळे होणाऱ्या त्रासापासून त्वचेचे रक्षण करते. कोरडी त्वचा, भेगा पडलेल्या टाचा, डागांमुळे त्वचेचा बिघडलेला पोत, चुकीच्या पद्धतीने झालेली केसांची वाढ, सूर्यकिरणांमुळे झालेले त्वचेचे नुकसान, पुरळ यासारख्या त्रासांवर झेंडूची फुले गुणकारी आहेत. कॅमोमाइल सर्वाधिक प्राचीन वनौषधींपैकी एक म्हणून कॅमोमाइलला ओळखले जाते. सुकवलेल्या कॅमोमाइल फुलांचा उपयोग त्वचेसाठी अनेक प्रकारे केला जातो. हे फुल टर्पेनॉइड्स आणि फ्लॅव्हेनॉइड्ससारख्या अँटीआॅक्सिडंट्सनी समृद्ध आहे. या तेलाचे फायदे पाहायचे झाले तर प्रखर सूर्यकिरणांमुळे होणारा त्वचेचा दाह ते कमी करते. कोरड्या, जळजळ होणाऱ्या त्वचेवर लाभदायी आहे. तुम्हाला मुलायम, आरोग्यदायी त्वचा मिळवून देते. त्यातल्या दाहविरोधी आणि जीवाणुविरोधी गुणधर्मांमुळे फायदा होतो. हे तेल वजनाला हलके आहे. त्यामुळे त्वचेच्या आतल्या स्तरांपर्यंत झिरपते. त्यातून तरुण आणि नितळ पोत त्वचेला मिळतो.मुरुम, सुरकुत्या आणि त्वचेच्या इतर त्रासांवर कॅमोमाइल तेल वापरायचे असेल तर त्याचे दोन-तीन थेंब कापसाच्या स्वच्छ बोळ्यावर घ्यावेत आणि त्वचेवर ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तिथे लावावे. जास्मिन सुंदरसे लहान पांढरे जास्मिनचे रोपटे अत्यंत आकर्षक दिसते. त्यातल्या भुलवणाऱ्या सुगंधामुळे ते नैसर्गिक कामोत्तेजक मानले जाते. त्वचेसाठी ते अत्यंत गुणकारी आहे. दाहनाशक, जंतुनाशक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या या फुलात तुमची त्वचा सुंदर, तजेलदार आणि नितळ करण्याची अनेक गुपिते दडली आहेत. तुमच्या त्वचेला जास्मिन तेल नवचेतना देते, ती मुलायम करते. त्याशिवाय तुमचे मनही शांत करते. त्याशिवाय स्ट्रेच मार्क तसेच डाग कमी करते. त्वचेचा पोत सुधारते. कोरडी त्वचा शांत करते. सूर्यकिरणांमुळे होणारा दाह कमी करते. त्वचेची इलॅस्टिसिटी पुन्हा बहाल करते. कार्नेशन कार्नेशन हे जगातल्या सर्वाधिक लोकप्रिय फुलांपैकी एक फूल आहे. त्याचा गोडसर, सौम्य आणि प्रभावी सुगंध तुमचा मूड उंचावतो. तुमच्या शरीराला आणि मनाला नवचेतना देण्यात कार्नेशन फारच प्रभावी ठरते.कार्नेशन तेल सूज कमी करण्यासाठी, त्वचेवरील पुरळ दूर करण्यासाठी औषधोपचारांत वापरले जाते. त्याशिवाय त्वचेवरील सुरकुत्या, रेषा यांच्यावरच्या उपचारांतही ते प्रभावी आहे. कार्नेशनच्या सुगंधामुळे तसंच सशक्तीकरणाच्या गुणधर्मामुळे ते सुगंधी द्र्रव्ये बनवण्यासाठी वापरले जाते. त्याशिवाय त्याला कामोत्तेजकही मानले जाते. डँडेलिआॅन डँडेलिआॅन या रोपट्याचा त्वचेची निगा राखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांत फार उपयोग होतो. डँडेलिआॅन रूट ज्युसच्या अँटीआॅक्सिडंट्स गुणधर्मामुळे ते त्वचेला विषमुक्त करतात. त्याशिवाय याचा उपयोग सूक्ष्म जीवाणू मारण्यासाठीही होतो. त्यामुळे मुरुम, पुटकुळ्यांच्या समस्येवर मात होते. वयाच्या आधी त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्यांसारख्या समस्येला कारणीभूत ठरणाऱ्या फ्री रॅडिकल्सच्या समस्येवरही हे तेल गुणकारी आहे. डँडेलिआॅन रोपट्याचे खोड मोडले की तुम्हाला दुधासारखा पांढरा द्रव मिळतो. हा द्रव त्वचेसाठी फार गुणकारी आहे. डँडेलिआॅनचा रस हा अल्कलाइन आहे. त्यातल्या बुरशीनाशक गुणधर्मामुळे ते त्वचेची जळजळ, दाह उत्पन्न करणाऱ्या त्रासावर मात करते. लॅव्हेंडर : हिरव्यागार गवतात उगवलेले मऊशार, जांभळे फुलांचे आकर्षक सुवास असलेले हे फूल सर्वांनाच लहानपणीच्या आठवणी जागवण्यास भाग पाडते. हे फूल केवळ सुंदरच नाही, तर ते सूर्यकिरणांमुळे होणारा त्वचेचा दाह, पुटकुळ्या, जळजळ, अनिद्रा अशा त्रासांवर उपयुक्त आहे. ते अनेक पोषक घटकांनी समृद्ध आहे. त्यात अनेक दाहनाशक गुणधर्म आहेत. त्यामुळे त्वचेवरील दाह कमी होतो. रक्तप्रवाह सुधारते. त्वचेवरील विषघटक नष्ट करते, थकलेल्या स्नायूंना नवसंजीवनी देते, त्यामुळे चांगली झोप लागते. १०० टक्के नैसर्गिक आणि शुद्ध असलेले सोलफ्लॉवर इसेंशियल आॅइल ताज्या किंवा सुकवलेल्या लॅव्हेंडरच्या रोपट्यापासून मिळवले जाते. हे तेल थेट त्वचेवर लावता येते. त्वचा संवेदनशील असेल तर सोलफ्लॉवरच्या अन्य इसेंशियल तेलात मिसळून वापरता येईल.

रजनीगंधा ट्यूबरोझला रजनीगंधा म्हणूनही ओळखले जाते. हे एक मेणचट पांढरे फूल असून, त्याला गोडसर असा सुगंध आहे. ते एक प्रभावी कामोत्तेजक आहे. त्याशिवाय तुमचे मन शांत करण्यातही उपयुक्त ठरते. हे फूल त्याच्या प्रभावी, शक्तिशाली, मादक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधामुळे ओळखले जाते. शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी आणि रोमँटिक भावना जागवण्यासाठी ते उपयुक्त ठरते. रजनीगंधाचे तेल बर्गमोट, क्लॅरी सेज, फ्रँकिन्सीन, जेरानियम, लॅव्हेंडर, गुलाब अथवा चंदनाच्या तेलात मिसळून चांगल्या प्रतीचे तेल मिळवता येते.