Join us  

सखींसाठी ‘ती फुलराणी’ची पर्वणी

By admin | Published: April 13, 2017 3:11 AM

देशभरातील महिलांसाठी सशक्त व्यासपीठ असलेल्या ‘लोकमत’ सखी मंचने नव्या वर्षातील सदस्यांसाठी विशेष पर्वणी आयोजित केली आहे. २०१७ मध्ये नोंदणी केलेल्या

मुंबई : देशभरातील महिलांसाठी सशक्त व्यासपीठ असलेल्या ‘लोकमत’ सखी मंचने नव्या वर्षातील सदस्यांसाठी विशेष पर्वणी आयोजित केली आहे. २०१७ मध्ये नोंदणी केलेल्या सखींसाठी ‘ती फुलराणी’ या नव्या नाटकाचा प्रयोग १४ एप्रिल रोजी सायंकाळी ३.३० वाजता दादर, शिवाजी मंदिर येथे रंगणार आहे.पु. ल. देशपांडे यांच्या ‘ती फुलराणी’तील ‘फुलराणी’ काळानुरूप बदलत गेली. भक्ती बर्वे, प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी आणि अमृता सुभाष अशा चौघींनी ‘फुलराणी’ उभी केली. या सगळ्यांनी फुलराणी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. त्यानंतर, आता अष्टगंध एंटरटेन्मेंट निर्मित अँडोनिस एंटरप्रायझेस प्रकाशित ‘ती फुलराणी’ या नाटकात प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी हिने फुलराणी भूमिका साकारली आहे. धनंजय चाळके याचे निर्माते आहेत. फुलराणीच्या भूमिकेतील हेमांगी कवीसोबत प्राध्यापकांच्या भूमिकेत डॉ. गिरीश ओक आहेत. सोबत मीनाक्षी जोशी, रसिका धामणकर, नितीन नारकर, प्रांजल दामले, विजय पटवर्धन, निरंजन नारकर, निरंजन जावीर, हरीश तांदळे, दिशा दानडे, सुनील जाधव, अंजली मायदेव हे कलाकारही यात आहेत. सूत्रधार नितीन नाईक आहेत. (प्रतिनिधी)