लग्नसराईत फुलांचे दर भिडले गगनाला

By Admin | Published: May 26, 2015 10:57 PM2015-05-26T22:57:52+5:302015-05-26T22:57:52+5:30

लग्नसराईच्या काळात फुलांचे दर आकाशाला भिडले असून वितभर गजऱ्यासाठी वीस ते तीस रुपये मोजण्याची वेळ आली आहे. मागणीच्या तुलनेत फुलांची आवक कमी झाल्याने दरवाढ झाल्याचे सांगण्यात येते.

The flowers of the wedding were filled with flowers | लग्नसराईत फुलांचे दर भिडले गगनाला

लग्नसराईत फुलांचे दर भिडले गगनाला

googlenewsNext

ठाणे : लग्नसराईच्या काळात फुलांचे दर आकाशाला भिडले असून वितभर गजऱ्यासाठी वीस ते तीस रुपये मोजण्याची वेळ आली आहे. मागणीच्या तुलनेत फुलांची आवक कमी झाल्याने दरवाढ झाल्याचे सांगण्यात येते.
सध्या लग्नसराईची जोरदार धामधूम सुरू आहे. मंगल कार्यालये हाऊसफुल्लं झाली असून बँडपथकांसह भटजी मिळणेही मुश्कील झाले आहे. कापड खरेदीसाठी शहरात दुकानदारांकडे गर्दी आहे. लग्नसाठी मुहूर्त पाहणे, भटजी शोधणे, आचारी ठरविणे यासाठी धावपळ सुरू असतानाच प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी महिलांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो तो गजऱ्याचा. एकाच वेळी पन्नास-शंभर महिलांसाठी गजऱ्याची खरेदी करावी अशी स्थिती आता राहिलेली नाही.
एरवी दोनशे ते अडीचशे रुपये किलोपर्यंत असणारे मोगऱ्याचे दर तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे वीतभर गजऱ्यासाठी वीस रुपयांची नोट विक्रेत्यांच्या हातावर ठेवावी लागत आहे. पांढरा आणि अबोली गजरा हवा असेल तर, चाळीस रुपयेही मोजावे लागते. लग्नाचे मुहूर्त कडक असले की, गजरा महाग आणि इतर वेळी स्वस्त असे गणित या व्यवसायाचे आहे. (प्रतिनिधी)

एप्रिल आणि मे असे दोन 'सिझन'चे महिने असल्याने मागणीत मोठी वाढ होते. वधू-वरांसाठी आवश्यक असलेल्या वरमालेचे दरही वाढले आहेत. जादा सजावट करून वरमाला हवी असेल तर त्या तुलनेत दरही वाढवले जातात. यासाठी वापरल्या जाणाऱ्या निशिगंधा फुलांचा दर किलोला ६0 ते ८0 रुपये इतका झाला हे विशेष.

Web Title: The flowers of the wedding were filled with flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.