पक्ष्यांना सनस्ट्रोकचा फटका

By Admin | Published: November 22, 2014 10:36 PM2014-11-22T22:36:47+5:302014-11-22T22:36:47+5:30

मलेरियासह साथीच्या आजारांनी हैराण झालेले असतानाच घोडबंदर रोड, डोंबिवली, मुलुंड आणि भांडुप आजूबाजूच्या परिसरांतील सुमारे 35 दुर्मीळ व स्थानिक पक्ष्यांनाही सनस्ट्रोकचा फटका बसला आहे.

Fluorescence of the Birds | पक्ष्यांना सनस्ट्रोकचा फटका

पक्ष्यांना सनस्ट्रोकचा फटका

googlenewsNext
पंकज रोडेकर - ठाणो
पावसाळ्यानंतर सतत होणारा वातावरणातील बदल आणि वाढणा:या उष्णतेमुळे मुंबईसह ठाण्यात मानवप्राणी डेंग्यू, मलेरियासह साथीच्या आजारांनी हैराण झालेले असतानाच घोडबंदर रोड, डोंबिवली, मुलुंड आणि भांडुप आजूबाजूच्या परिसरांतील सुमारे 35 दुर्मीळ व स्थानिक पक्ष्यांनाही सनस्ट्रोकचा फटका बसला आहे. यात जखमी झालेल्या पक्ष्यांपैकी सध्या 16 पक्ष्यांवर उपचार सुरू आहेत, तर 19 पक्ष्यांना उपचार करून जंगलात मुक्त संचारासाठी सोडण्यात आले आहे. मागील चार वर्षात ठाण्यातील एएसपीसीए या संस्थेने 3क्क्-35क् विविध पक्ष्यांना अशा प्रकारे जीवनदान दिले आहे.
यंदा पावसाळा जरी लांबणीवर पडला असला तरी उशिरा सुरू झालेला पाऊस अजूनही अधूनमधून बरसत आहे. त्यामुळे वातावरणात अचानक उष्णतेचा पारा चढतो. याचा सर्वाधिक त्रस पक्ष्यांना होतो. ऑक्टोबर हीट सुरूझाल्यापासून आतार्पयत सनस्ट्रोकच्या तडाख्याने 35 पक्ष्यांना मुलुंड, भांडुप, डोंबिवली, ठाणो शहरातील आजूबाजूच्या परिसरांत जखमी अवस्थेत ब्रrांड येथील ‘एएसपीसीए’ या संस्थेत उपचारार्थ आणण्यात आले. ज्या पक्ष्यांना सनस्ट्रोकचा फटका बसला आहे, त्यांना या संस्थेने सनस्ट्रोकपासून वाचविण्यासाठी खास व्यवस्था केली आहे. तसेच संस्थेत आणलेल्या पक्ष्यांना अॅण्टीस्ट्रेस व्हिटामिन सी तर जखमी झालेल्यांवर वेळीच शस्त्रक्रिया किंवा मलमपट्टीही करण्यात येते. त्या पक्ष्यांवर यशस्वी उपचार करून पुन्हा त्यांना येऊर, घोडबंदर रोड आणि मानकोली येथील जंगल परिसरात मुक्त संचारासाठी सोडले जाते. 
 
गतवर्षी 6क् ते 65 पक्ष्यांना कूलस्ट्रोक
पावसाळ्यात कूलस्ट्रोकमुळे जखमी झालेल्या 5क् पक्ष्यांना ठाणो, मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरांतून ब्रrांड येथील एएसपीसीए या संस्थेत उपचारार्थ दाखल केले होते. या पक्ष्यांवर यशस्वी उपचार करून त्या सर्वाना येऊरच्या जंगलात सोडून देण्यात आले. त्यामध्ये ससाणो, घारी, कावळे आणि कबुतरं अशा पक्ष्यांचा समावेश असून गतवर्षीही पावसाळ्यात जवळपास 6क् ते 65 पक्ष्यांना कूलस्ट्रोकचा फटका बसला होता.
 
यंदा 19 पक्ष्यांना सोडले असून सध्या 3 ससाणो, 5 घारी, 4 घुबडं, 3 कावळे आणि 1 भारद्वाज अशा एकूण 16 पक्ष्यांवर या संस्थेतील डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू असल्याचे पक्षिवैद्य डॉ. सुहास राणो यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

 

Web Title: Fluorescence of the Birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.