‘हँकॉक पुलाऐवजी एफओबी बांधा’
By admin | Published: May 7, 2016 02:22 AM2016-05-07T02:22:41+5:302016-05-07T02:22:41+5:30
हँकॉक ब्रिज पाडल्यानंतर ट्रॅक क्रॉस करताना मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याची बाब लक्षात घेत उच्च न्यायालयाने येत्या चार आठवड्यांत योग्य ती जागा पाहून पादचारी पूल बांधा
मुंबई : हँकॉक ब्रिज पाडल्यानंतर ट्रॅक क्रॉस करताना मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याची बाब लक्षात घेत उच्च न्यायालयाने येत्या चार आठवड्यांत योग्य ती जागा पाहून पादचारी पूल बांधा, असे निर्देश उच्च न्यायालयाने महापालिका व पश्चिम रेल्वेला दिले.
सँॅडहर्स्ट रोड व मस्जीद बंदरजवळील अनुक्रमे हँकॉक व कर्नाक पूल तांत्रिक कारणास्तव तोडण्यात येणार असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार आहे. हे दोन्ही पूल तोडण्यापूर्वी रेल्वे व महापालिकेने नागरिकांना रेल्वे क्रॉसिंगसाठी तात्पुरत्या स्वरूपाचा पूल बांधून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शेनॉय यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले.