Join us  

महसूलचे काम गतिमान करण्यावर भर

By admin | Published: May 22, 2014 4:40 AM

रायगड जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचाº्यांची बैठक आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी भांगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली

अलिबाग : महसूल अधिकारी-कर्मचार्‍यांनी सामान्य माणसाचे हित डोळ्यासमोर ठेवून प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान करावे, त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी रायगड महसूल प्रशासनात विशेष मोहीम राबविण्यात येईल असे नियोजन रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचाº्यांची बैठक आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी भांगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सतिश बागल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विश्वनाथ वेटकोळी, महसूल अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेच्या प्रश्न आणि समस्यांची जागेवरच सोडवूणक महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान करण्यावर शासनाने सर्वोच्च भर दिला असल्याचे सांगून जिल्हाधिकारी भांगे म्हणाले, जिल्ह्यात सुवर्ण जयंती राजस्व अभियानाच्या माध्यमातून महसूल प्रशासन अधिक पारदर्शक गतिमान करण्याचा प्रयत्न असून या अभियानातून गावागावात शिबीरे घेवून जनतेला भेडसावणारे प्रश्न आणि समस्यांची जागेवरच सोडवूणक करण्यास प्राधान्य दिले आहे. यापुढील काळात महूसल यंत्रणेतील अधिकार्‍यांनी सुर्वण राजस्व अभियान अधिक गतीने राबविण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. येणार्‍या पत्रांची प्राधान्याने दखल घेवून त्यांची तत्काळ निर्गती जिल्ह्यातील महसूल प्रशासनाकडे प्रलंबित असलेले जनतेचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविण्याचे आदेश देवून जिल्हाधिकारी भांगे म्हणाले, सर्व सामान्य जनतेकडून येणारे प्रश्न तात्काळ सोडविले जावेत यासाठी महसूल प्रशासनात विशेष मोहिम हाती घेतली जाईल. याबरोबरच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मान्यवरांच्या पत्रांची प्राधान्याने दखल घेवून त्यांची तत्काळ निर्गती करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी बैठकीत केली. यावेळी महसूल विभागाकडील कामकाजाचा विभागनिहाय व तालुकानिहाय आढावाही भांगे यांनी घेतला. (विशेष प्रतिनिधी)