संजय पांडे यांचे आवाहन; राज्यभरात पोलीस यंत्रणा सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांनी आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये, नियमांचे पालन करून प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी बुधवारी केले.
संचारबंदीच्या या काळात दोन लाखांहून अधिक पोलीस दोन शिफ्टमध्ये कार्यरत असतील. त्यांच्या मदतीला सुमारे १४ हजार होमगार्ड आणि राज्य राखीव दलाच्या २० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
टाळेबंदीच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच काेरोना रुग्णांना सहाय्य करण्यासाठी पोलिसांना सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिकांना कसलीही आवश्यकता भासल्यास स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पांडे यांनी केले आहे.