मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह रायगड, पालघरच्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नववर्ष स्वागताचे बेत आखले जात आहेत. शिवाय अनेकांनी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी एखाद्या पर्यटनस्थळी जाऊ न सेलिब्रेशनची तयारी सुरू केली आहे. नववर्षाचे स्वागत करताना अनेकदा अतिउत्साहामुळे दुर्घटना घडतात. हे टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळून नववर्षाचे स्वागत करणे गरजेचे आहे, असे मत ‘लोकमत’च्या वाचकांनी व्यक्त केले. त्यातील निवडक प्रतिक्रियांचा धांडोळा.सुरक्षित प्रवासाठी संकल्प करावर्ष २०१८ सरायला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. ‘नेमेची येतो पावसाळा’ याप्रमाणे नवीन वर्ष नेहमीच येत राहणार. तरीही या नवीन वर्षाचे स्वागत काही हौशी धनदांडगे विविध ठिकाणी जाऊन करतील. या नववर्षाचे स्वागत सामान्य गरीब माणूस करीत नाही हे बरे आहे. त्याला नवीन वर्ष काय आणि जुने काय सारखेच! याच नवीन वर्षाच्या उत्साहात काही जण दारू ढोसून समुद्रात पोहायला जातात आणि मरण पावतात; तर काही तरुण मंडळी भरधाव गाड्या चालवून अपघाताला आमंत्रण देतात. त्यामुळे या नववर्ष स्वागताचा त्रास पोलिसांपासून सर्वांनाच होतो. याचसाठी ही नवीन वर्ष स्वागत पद्धत लोकांनी बदलायला हवी. त्यासाठी नव्या वर्षात वाहतुकीच्या नियमांचे पालन करून आपल्या आणि सहप्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाठी संकल्प करणे गरजेचे आहे.- अरुण पां. खटावकर, लालबागवाहतूक नियमांचे पालन करूनकरा नववर्षांचे स्वागत!बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्व जग हे जवळ आलेले आहे. आजच्या तरुणाईवर ‘खा, प्या, मजा करा’ या पाश्चात्त्य संस्कृतीच्या चंगळवादाचा फार मोठा पगडा आहे. सणवार - उत्सव साजरे करण्याचे स्वरूपच बदलूून गेले आहे. आता तरुणाई मोठ्या आतुरतेने सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. आपल्याकडे मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये तर मोठाच उत्साह असतो. पण या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी उत्साही व्यक्तींकडून सर्रास वाहतुकीचे नियम मोडले जातात. त्यामुळे या काळात अनेक अपघात घडतात, त्यामुळे नववर्षाचे स्वागत दु:खद बातमीने होते. हे टाळण्यासाठी सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करून नववर्षाचे स्वागत करणे गरजेचे आहे. तेव्हाच नववर्षाचे स्वागत मंगल झाले असे म्हणता येईल.- अनंत बोरसे, शहापूर, जिल्हा ठाणे.सुरक्षित प्रवासावरभर देणे गरजेचेमद्यपान, पार्टी करूनच नवीन वर्षाचे सेलिब्रेशन होऊ शकते असे नाही. मद्यसेवन केलेली व्यक्ती गाडी चालवते, तेव्हा अपघाताची शक्यता अधिक असते. अशा पद्धतीच्या सेलिब्रेशनमुळे जीवावर बेतू शकते. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवासावर भर देणे गरजेचे आहे. तसेच नवीन वर्षात नातेवाईक, परिवाराला वेळ दिला पाहिजे.- मनीषा थोरात, मुलुंडवाहतूक नियमांचे भान हवेनवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्व जण सज्ज झाले आहेत. यासाठी अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात. मात्र आनंद लुटताना सुरक्षित प्रवास करणे आवश्यक आहे. एकाचवेळी सर्व जण बाहेर पडल्याने वाहतूककोंडी, रेल्वे वेळापत्रक विस्कळीत होते. त्यामुळे वाहतूककोंडीपासून सुटका होण्यासाठी शॉर्टकट वापरू नये. ओव्हर टेक, लेन तोडणे, असे वाहतूक नियमांचे उल्लंघन होऊ नये, याचे भान आपण ठेवले पाहिजे.- संतोष उघडे, कुर्लासेलिबे्रशन घरातच करावे‘डोंट ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह’चे फलक आपण वाचतोच. त्याप्रमाणे त्या नियमांचे पालनही करणे तितकेच गरजेचे आहे. ड्रिंक अॅण्ड ड्राइव्हमध्ये पकडल्यावर अडीच हजार रुपयांचा दंड आणि कैद होण्यापेक्षा हेच पैसे मौजमज्जा आणि पार्टी करण्यासाठी वापरा. मात्र, पार्टी करताना शक्यतो घरगुती पार्टी करावी. जेणेकरून गाडी चालविण्याची गरज पडणार नाही. कुटुंबासोबत बाहेर जात असाल तर मुलाबाळांची, पत्नीची काळजी घ्या. तरुणाईने मद्य पिण्यावर कंट्रोल ठेवणे गरजेचे आहे. तरुणाईच्या घशात दोन घोट मद्याचे उतरले की, त्यांची बाइक हवेत उडू लागते. हवेत उडण्यापेक्षा गाण्याच्या तालावर थिरकणे हे कितीतरी पटीने चांगले आहे.- अंकिता मोरे, बोरीवलीइतरांच्याही सुरक्षिततेचेभान ठेवा...३१ डिसेंबर राहत्या घरापासून दूर जाऊन साजरा करण्याची परंपरा तरुणाईत निर्माण झाली असून, याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. इच्छितस्थळी पोहोचण्याच्या अगोदरच अतिउत्साहाच्या भरात गाडीमध्येच मद्य प्राशन केले जाते. हे अनेकदा जीवावर बेतल्याच्या घटना ऐकिवात येतात. पोलिसांकडून जागोजागी तपासणी नाक्यांवर अशा चालकांची तपासणी केली जाते. पण तरीही त्यावर मात करून मद्यधुंद चालक बिनधास्त गाड्या चालवतात. एकदा कोणत्याही नशेने आपल्या मनाचे नियंत्रण त्याच्या ताब्यात घेतले की, कोणत्या ना कोणत्या अपघाताला सामोरे जावे लागणार हे निश्चितच असते. सरत्या वर्षाला निरोप देत, नवीन वर्षात उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने सुरू होणाऱ्या प्रवासाच्या दृष्टीने स्वत:च्या सुरक्षिततेसोबत इतरांच्याही सुरक्षिततेच्या दृष्टीने भान ठेवून नववर्ष स्वागताचा आनंद लुटण्याचे भान ठेवले पाहिजे.- दयानंद सावंत, अंधेरीबेताल गाड्या पळवू नका३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन मुंबईकरांना नवीन नाही. यातच काही मद्यधुंद लोक बेताल गाड्या पळवत आपल्याच पोलीस सुरक्षा यंत्रणेवर ताण निर्माण करतात. या दिवशीचा प्रवास सर्व मुंबईकरांसाठी सुरक्षित करायचा असेल, तर जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्व नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य केलेच पाहिजे. तेच खºया अर्थाने नवीन वर्षाचे योग्य स्वागत ठरेल.- अश्विनी साखळकर, दहिसर‘कोंडीमुक्ती’साठी नववर्ष स्वागत सार्वजनिक वाहतुकीनेनाताळ आणि नवीन वर्षात पर्यटनस्थळी अनेक जण फिरायला जात असतात. त्यामुळे रेल्वे आणि बस वाहतूक वाढविणे आवश्यक आहे. खासगीपेक्षा सार्वजनिक वाहतुकीचा वापर केल्यास वाहतूककोंडी निर्माण होणार नाही. नवीन वर्षात पदार्पण करीत आहोत. त्यामुळे या नवीन वर्षात प्रत्येकाने संकल्प केला पाहिजे की, वाहतुकीचे नियम, रेल्वेचे नियम पाळू.- नम्रता तळेकर, सांताक्रुझअतिउत्साह धोकादायक३१ डिसेंबरच्या दिवशी सर्वत्र सेलिब्रेशनचे वातावरण असते. मात्र अतिउत्साह धोकादायक असतो. बाहेर जाण्याचे प्लान आखले असतील, तर त्याचे नियोजन तंतोतत करणे आवश्यक आहे. हॉटेल किंवा गेस्ट रूमवर राहत असताना त्यांची नियमावली, प्रत्येक गोष्टीचे दर पडताळून बघितले पाहिजेत. जेणेकरून बिलाची रक्कम जास्त होणार नाही. रेल्वे किंवा बसमध्ये फिरताना किंवा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करू नये.- जितू चौधरी, मालाडपोलिसांनाही सहकार्य करा!तरुणाईत ३१ डिसेंबरच्या दिवशी सेलिब्रेशनचे वारे भिनलेले असते. मात्र अतिउत्साही तरुणांमुळे नववर्षाच्या पूर्वसंध्येला अपघात होतात. पण हे वाहतुकीचे नियम पाळून, तसेच या काळात वाहतूक नियंत्रणाचे काम करणाºया पोलीस कर्मचाºयांना सहकार्य केल्यास आपण हे टाळू शकतो.- अमेय गिरधर, नालासोपारा
वाहतुकीचे नियम पाळून करा ‘नववर्ष स्वागत’!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 4:37 AM