कोरोनाबाबत नियमांचे पालन करणे हीच समाजसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:06 AM2021-02-24T04:06:17+5:302021-02-24T04:06:17+5:30
मुंबई : कोरोना अद्याप गेला नाही; परंतु तरीही अनेक लोकांनी मास्क लावणे सोडून दिले आहे. हे बेजबाबदार सामाजिक वर्तन ...
मुंबई : कोरोना अद्याप गेला नाही; परंतु तरीही अनेक लोकांनी मास्क लावणे सोडून दिले आहे. हे बेजबाबदार सामाजिक वर्तन चिंतेचा विषय आहे, असे नमूद करतानाच कोरोनाबाबत नियमांचे सर्वांनी पालन करणे हीच खरी समाजसेवा ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
धारावीला कोरोनामुक्त करणाऱ्या ३० कोरोना योद्धयांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कोरोना काळात लोकप्रतिनिधी, पोलीस, पत्रकार, डॉक्टर्स, नर्सेस, स्वच्छताकर्मी यांच्यासह सामान्यातील सामान्य माणसाने सेवा रूपाने समाजाला आपले योगदान दिले, असे राज्यपाल म्हणाले.
मुंबई महापालिका सहायक आयुक्त किरण दिघावकर, सहायक पोलीस आयुक्त रमेश नागरे, आरोग्य अधिकारी डॉ. वीरेंद्र मोहिते, इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचणेकर, लावणी कलावंत महासंघाचे अध्यक्ष संतोष लिंबोरे यांचा यावेळी गौरव करण्यात आला.