मुंबई विद्यापीठाच्या उपहारगृहात शिजतेय गरजूंसाठी अन्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 05:36 PM2020-04-18T17:36:56+5:302020-04-18T21:30:12+5:30

कम्युनिटी किचनमधून गरजू ,मजूर आणि बेघरांना अन्नाच्या पाकिटांचे वाटप

Food for the needy at the Mumbai University restaurant | मुंबई विद्यापीठाच्या उपहारगृहात शिजतेय गरजूंसाठी अन्न 

मुंबई विद्यापीठाच्या उपहारगृहात शिजतेय गरजूंसाठी अन्न 

Next

मुंबई :  कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटकालीन परिस्थितीत प्रत्येकजण आपापल्या परीने छोटी मोठी आणि जमेल तशी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. असाच प्रयत्न मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलाच्या उपाहारगृहातून होत आहे. या उपहारगृहातून कम्युनिटी किचन या संकल्पनेअंतर्गत विद्यापीठ शासनाच्या सहकार्यातून दररोज ५०० गरजू लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करणार आहे. विद्यानगरी संकुलातील उपहार गृहात विद्यापीठाने हे कम्युनिटी किचन सुरू केले असून सांताकृझ परिसरातल्या गरजू, बेघर आणि मजूरांना अन्नाच्या पाकीटांचे वाटप केले.    

 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात इतर राज्यातील अनेक स्थलांतरीत मजूर अडकून आहेत. अशा गरजू मजूरांना, बेघरांना आणि गरजवंताना तयार अन्नाची पाकिटे वाटपासंदर्भातील बाब विद्यापीठाच्या विचाराधीन होती. या अनुषंगाने सामाजिक बांधिलकेतून मुंबई विद्यापीठाने  महाराष्ट्र शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कम्युनिटी किचन सुरू केले आहे. या सेवेसाठी जिल्हाधिकारी वांद्रे यांनी धान्यपुरवठा केला असून यासाठी उपजिल्हाधिकारी पंकज देवरे यांनी पुढाकार घेतला. तर चिंगारी शक्ती फाऊंडेशनच्या पिंकी राजगरिया आणि अजयकुमार जलान यांच्या तर्फे तेल, मसाले व फूड पॅकेट्स व इतर साहित्य मोफत पुरविले आहेत. ह्यूमन राईट्स प्रोटेक्शन फोरमचे अध्यक्ष आशुतोष ठाकुर यांच्या सुनंदा गॅस एजन्सीने या सेवेसाठी गॅस सिलींडरची सोय करुन दिली आहे. विद्यापीठातील उपहार गृहात दररोज ५०० व्यक्तिंचे दोन वेळचे जेवण तयार होणार असून त्याच्या वितरणाची व्यवस्था जिल्हाधिकारी वांद्रे आणि विद्यापीठाच्या समन्वयातून केले जाणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी वांद्रे येथे विशेष कार्यासाठी नेमणूक झालेले विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक प्रसेनजीत खंडेराव यांची शासकीय कम्युनिटी किचनचे समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जोडीला विद्यापीठातील डॉ. विश्वभंर जाधव, डॉ. सुनिल अवचार, डॉ. रतीलाल रोहित यांच्यासह सुरक्षा अधिकारी बाळासाहेब खरात आणि काही शिक्षकेत्तर कर्मचारी यांची याकामी निवड करण्यात आली आहे.

 

कोव्हिड-१९ मुळे उद्भवलेल्या या संकटावर मात करण्यासाठी विद्यापीठाने शासनाच्या सहकार्यातून हे महत्वाचे कार्ये हाती घेतले असून समाज सेवेसाठी विद्यापीठाला ही एक संधी मिळाली असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. गरजवंतासाठी दोन वेळच्या अन्नाची व्यवस्था करण्यासाठी याकामी इच्छुकांनी सढळहस्ते जीवनावश्यक वस्तू देणगी स्वरुपात देण्याची ईच्छा असल्यास जरूर देण्याचे आवाहन कुलसचिव अजय देशमुख यांनी केले आहे.

Web Title: Food for the needy at the Mumbai University restaurant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.