शाळांच्या कॅन्टीन कर्मचाऱ्यांना देणार अन्नसुरक्षेचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 03:31 AM2020-02-24T03:31:53+5:302020-02-24T03:31:59+5:30

अन्नसुरक्षा आणि मानकं प्राधिकरणाने (एफएसएसएआय) शाळांतल्या कॅन्टीन कर्मचाऱ्यांना अन्नसुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Food security lessons for canteen staff at schools | शाळांच्या कॅन्टीन कर्मचाऱ्यांना देणार अन्नसुरक्षेचे धडे

शाळांच्या कॅन्टीन कर्मचाऱ्यांना देणार अन्नसुरक्षेचे धडे

Next

मुंबई : शाळेच्या मधल्या सुट्टीत मुलांनी पोषक आहार घेणे गरजेचे आहे. मात्र मागील काही वर्षांत ही जागा जंकफूडने घेतली आहे. या जंकफूडच्या सेवनावर मात करण्यासाठी वेळोवेळी सूचना केल्या जातात, मात्र काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर आता अन्नसुरक्षा आणि मानकं प्राधिकरणाने (एफएसएसएआय) शाळांतल्या कॅन्टीन कर्मचाऱ्यांना अन्नसुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुले शाळेत किंवा कॉलेजमध्ये डबा घेऊन गेली नाहीत की कॅन्टीनचा पर्याय असतो. शाळा आणि महाविद्यालयातील अनेक मुले सतत कॅन्टीमधील अन्न खातात. त्यामुळे कॅन्टीनमधील अन्न स्वच्छ आणि खाण्यासाठी सुरक्षित असावे, यासाठी आता शाळा आणि महाविद्यालयांतील कॅन्टीन कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मार्चअखेरीच्या आधी शाळा आणि कॉलेजांमधील कॅन्टीन कर्मचाºयांना हे प्रशिक्षण देण्याबाबतची माहिती अन्नसुरक्षा आणि मानकं प्राधिकरणाने शिक्षण संस्थांना दिली आहे. मुख्य म्हणजे या कर्मचाºयांना एफएसएसएआयच्या अधिकृत प्रशिक्षकांकडून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कॅन्टीनकडे अन्नसुरक्षा आणि प्रशिक्षण प्रमाणपत्र नसताना खाद्यपदार्थांची विक्री केल्यास दोन ते पाच लाखांपर्यंत दंड होऊ शकतो.

यात कॅन्टीनमधील कर्मचाºयांना अन्न शिजवताना बाळगण्याच्या स्वच्छतेबाबत धडे दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांकडून अन्नाच्या गुणवत्तेबाबत अभिप्रायही घेण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे. एफएसएसएआयच्या म्हणण्यानुसार, अन्नसुरक्षा आणि मानकं कायदा २००६ नुसार, खाद्यपदार्थ तयार करणारी व्यक्ती किंवा त्यासंदर्भातील व्यवसाय करणाºया व्यक्तीला प्रशिक्षण मिळणे अनिवार्य आहे.

Web Title: Food security lessons for canteen staff at schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.