Join us

२.२० लाख किंमतीचा खाद्यपदार्थ साठा जप्त, महापालिकेच्या भेसळ विभागाची कारवाई

By स्नेहा मोरे | Published: September 08, 2022 8:18 PM

विशेष मोहिमे अंतर्गत दि. १ ऑगस्ट २०२२ ते ०८ सप्टेंबर २०२२ या कालावधीत स्वीट मार्ट, फरसाण विक्रेते इ. आस्थापनांमध्ये कारवाई केली.

स्नेहा मोरे

मुंबई - सणासुदीच्या काळात बाजारपेठेत मिठाई, खवा, मावा, नमकीन अन्नपदार्थाना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या काळात खाद्यतेल, वनस्पती इ. अन्नपदार्थामध्ये भेसळ होण्याची तसेच कमी दर्जा अन्नपदार्थ उत्पादन व विक्री होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांना सुरक्षित, निर्भेळ व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत या करिता अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयाने अन्न आस्थापनांच्या तपासण्या व अन्न नमुने तपासणीसाठी घेण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे.

विशेष मोहिमे अंतर्गत दि. १ ऑगस्ट २०२२ ते ०८ सप्टेंबर २०२२ या कालावधीत स्वीट मार्ट, फरसाण विक्रेते इ. आस्थापनांमध्ये कारवाई केली. या कारवायांमध्ये एकूण ९६ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहे. तसेच खाद्यतेलाचा एकूण साठा २११२.५५ कि. ४,८४,८२२ रुपये किमतीचा भेसळीच्या संशयावरुन तसेच चोकलेट्स व चहा पावडर या अन्नपदार्थांचा एकूण १२५६ किलो एकूण रुपये २,२०,६६० इतका साठा जप्त करण्यात आला आहे.

भेसळयुक्त खवा, तूप, इ. चा वापर करून मिठाई बनवित असल्याचे आढळून आल्यास मिठाई विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त शशिकांत केकरे यांनी कळविले आहे.

१) मिठाई - ५१२) नमकीन ०६३) खाद्यतेल ०७4) तूप, वनस्पती १०५) इतर २२ 

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई