Join us

मुंबईच्या नाइटलाइफमध्ये फूड ट्रकला परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 3:24 AM

धोरण तयार, रात्री दहा ते सकाळी सहा मिळणार परवाना

मुंबई : नाइटलाइफ अंतर्गत मुंबईत फूड ट्रक ही परदेशात दिसून येणारी खाद्य संस्कृती लवकरच पाहायला मिळणार आहे. रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत पदपथावर फूड ट्रक उभा करून खाद्यपदार्थ विकण्याची परवानगी असणार आहे. याबाबतचे धोरण तयार असून यासाठी निश्चित केलेल्या नियमावली अंतर्गत फूड ट्रकला परवानगी देण्यात येणार आहे.प्रजासत्ताक दिनापासून मुंबईतील दुकाने, मॉल्स, चित्रपटगृहांना २४ तास सुरू राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबईतील काही मॉल मालकांनी वीकेण्डला सुरू राहण्याची तयारी दाखवली आहे.त्यानुसार या नाइटलाइफसाठी राज्य सरकारने नियमावली तयार केली आहे. याअंतर्गत फूड ट्रकची संकल्पना मुंबईत राबविण्यात येणार आहे. रात्री दहानंतर फूड ट्रकला मुंबईच्या रस्त्यांवर व्यवसाय करण्याची अनुमती आहे.यासाठी तयार केलेला धोरणानुसार फूड ट्रक उभे करण्यास इच्छुकांना परवानगी देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक निश्चित केलेल्या जागेवर केवळ पाच फूड ट्रक उभे करण्याची परवानगी असेल.मात्र या फूड ट्रकला २४ नव्हे तर रात्री दहा ते सहा या वेळेतच आपला व्यवसाय करावा लागणार आहे. सकाळी सव्वासहा वाजता त्यांना रस्ता खाली करणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे, प्रत्यक्षात नाईट लाईफ सुरू होण्याची़असे काही नियम...4 फोल्डिंग टेबल रस्त्यावर मांडण्याची परवानगीप्रत्येक फूड ट्रकला असेल.16 आसन व्यवस्था20 मीटरचे अंतर दोन फूड ट्रकमध्ये असणे बंधनकारक आहे.हे फूड ट्रक खासगी अथवा सार्वजनिक वाहनतळावर उभे करण्यात यावे.पदपथ ब्लॉक न करता केवळ ४० टक्के जागेवरच टेबलची मांडणी असावी.ग्राहकांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचा दर्जा चांगला असावा (बी ग्रेड). तसेच व्यवसाय झाल्यानंतर त्या परिसराची स्वच्छता ठेवावी.आसपासच्या परिसराला त्रास होईल असा कोणताही आवाज तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवू नये.रात्री दीड नंतर मद्य विक्री केली जाणार नाही, असे २४ तास सुरू राहण्यास इच्छुक असलेल्या उपहारगृह आणि आस्थापनांना लिखित स्वरूपात अबकारी विभागाला कळवावे लागेल.या नियमावली अंतर्गत रात्री उशिरा सुरू राहणाºया मॉल्स, व्यापारी संकुलांना याबाबत पालिकेचे स्थानिक विभाग कार्यालय, पोलीस ठाणे आणि अबकारी विभागाला सूचित करावे लागेल.२४ तास सुरू राहणाºया मॉल, आस्थापना यांना ग्राहकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, सुरक्षा व्यवस्था,वाहतूक व्यवस्था असावी. तसेच स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागणार आहेत.रात्री दीडनंतर मद्य विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यातयेणार आहे, ती खालीलप्रमाणेरेस्टॉरंट/ आस्थापनाचा मद्य विक्रीचा परवाना दोन वर्षांसाठी रद्द होऊ शकतो.मॉल २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी रद्द करण्यात येईल.

 

टॅग्स :मुंबईअन्ननाईटलाईफ