टिसमधील आंदोलकांमध्ये फुट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2018 11:41 PM2018-03-04T23:41:16+5:302018-03-04T23:41:16+5:30
चेंबूर येथील टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस (टिस) मधील एस.सी आणि एस.टी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अचानक वसतीगृह आणि मेसचे शुल्क वाढविल्याने विद्यार्थ्यांच्या युनियनने याविरोधात आंदोलन उभे केले आहे.
Next
मुंबई - चेंबूर येथील टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस (टिस) मधील एस.सी आणि एस.टी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अचानक वसतीगृह आणि मेसचे शुल्क वाढविल्याने विद्यार्थ्यांच्या युनियनने याविरोधात आंदोलन उभे केले आहे. मागील १२ दिवसांपासून सुरू असलेले हे आंदोलन युनियनमधील ७ सदस्यांपैकी ५ सदस्यांनी मागे घेतले आहे. परंतु उर्वरीत दोन सदस्य आणि विद्यार्थ्यांच्या विविध ग्रुपने मागे घेतलेले नसून या विद्यार्थ्यांनी सोमवारी ‘चलो टिस’चा नारा दिला आहे. ५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारावर मुंबईतील इतर संघटनादेखील याबाबत आंदोलन करणार आहेत, अशी माहिती आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिली.