Video: दबकी पाऊलं अन् चमकणारे डोळे; भाईंदरमध्ये पुन्हा दिसला बिबट्याचा वावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 08:22 AM2023-10-04T08:22:26+5:302023-10-04T08:34:59+5:30

पालखाडी भागात गेल्या १५ दिवसां पासून बिबट्या वाघाचा वावर असल्याचे रहिवासी सांगतात .

Footsteps and sparkling eyes; Leopard tiger again in the uplands of Bhayander | Video: दबकी पाऊलं अन् चमकणारे डोळे; भाईंदरमध्ये पुन्हा दिसला बिबट्याचा वावर

Video: दबकी पाऊलं अन् चमकणारे डोळे; भाईंदरमध्ये पुन्हा दिसला बिबट्याचा वावर

googlenewsNext

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील पालखाडी भागात बिबट्या वाघाचा वावर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे . काही पाळीव कुत्रा , मांजर बेपत्ता असून बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आल्याचे लोक सांगतात . मार्च महिन्यातच ह्या भागात एका रहिवाश्याने लावलेल्या जाळ्यात बिबट्या सापडला होता . 

पालखाडी भागात गेल्या १५ दिवसां पासून बिबट्या वाघाचा वावर असल्याचे रहिवासी सांगतात . पाळीव कुत्रा , मांजर त्याने फस्त केल्याची शक्यता आहे . बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळून आले आहेत . तर सदर ठसा बिबट्याचा असल्याचे जाणकारांनी सांगितले .  दुचाकी वरून रात्री जाणाऱ्या एकाला बिबट्याचे ओझरते दर्शन झाल्याची चर्चा आहे . एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आलेला प्राणी बिबट्या असल्याचे स्थानिक सांगत असले तरी त्याची खात्री झालेली नाही . बिबट्याच्या संचार मुळे रहिवाशां मध्ये भीतीचे वातावरण आहे. ह्या आधी गेल्या वर्षा पासून उत्तनच्या खोपरा , पालखाडी , खाडीवर तर लगतच्या मुंबई हद्दीतील गोराईच्या जंगलात बिबट्या वाघाचे दर्शन आदिवासी व रहिवाशी यांना झाले होते . वन विभागाने परिसरात जनजागृती करून लोकांना आवश्यक सूचना दिल्या होत्या . त्यांनी खास कॅमेरे बसवले होते. 

२४ मार्च रोजी पालखाडी भागातील राधिका वृद्धाश्रम मागे डॅनी घोन्साल्विस यांनी लावलेल्या पिंजऱ्यात मादा बिबट्या वाघ अडकला होता . डोक्याला मार लागून तो जखमी झाला होता . वन विभागाने बिबट्याची सुटका करून पिंजरा ताब्यात घेत गुन्हा दाखल केला होता .

Web Title: Footsteps and sparkling eyes; Leopard tiger again in the uplands of Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.