Join us

६० हजारांसाठी त्याने पळवले चक्क पाच कोटींचे रेल्वे इंजिन; अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 7:44 AM

ट्रान्सपोर्ट कंपनीच्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : परेल ते कालका येथे इंजिन पोहोचविण्याची जबाबदारी दिलेल्या ट्रान्सपोर्ट कंपनीने पैशांच्या वादातून रेल्वेचे ५ कोटी किमतीचे इंजिन पळविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी एका नामांकित ट्रान्सपोर्ट कंपनीच्या अधिकाऱ्याविरुद्ध रविवारी गुन्हा नोंदवला आहे.

वडाळा ट्रक टर्मिनल येथील रहिवासी असलेले अनिलकुमार गुप्ता यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. २७ एप्रिल रोजी त्यांना रेल्वे इंजिन लोड करुन मुंबई ते कालका येथे सोडण्याबरोबर कालकावरून रेल्वे इंजिन लोड करून मुंबई येथे आणण्याचे काम मिळाले होते. या कामासाठी त्यांनी राधा रोडवेजचे पदाधिकारी पवन शर्मा यांच्याशी सव्वा चार लाखांचा करार केला. करारानुसार तीन टप्प्यात चार लाख रुपये दिले. उर्वरित २५ हजार काम पूर्ण झाल्यानंतर देण्याचे ठरले.

शर्मा यांच्याकडून त्यांच्या मोटार ट्रेलरमध्ये रेल्वे इंजिन मुंबई येथून लोड करुन कालका येथे पोहोचविले. २ मे रोजी कालका येथून मुंबईच्या डिलिव्हरीसाठी इंजिन लोड करून घेतले; मात्र ते वेळेत न पोहोचविल्याने त्यांच्याकडे जाब विचारला. तेव्हा कामाचे एक लाख रुपये उशिरा दिले म्हणून ६० हजार रुपये अतिरिक्त दिल्यानंतरच डिलिव्हरी देण्याची अट घातली; मात्र पैसे वेळेत दिले असून उर्वरित २५ हजार डिलिव्हरी नंतर देणार असल्याचे सांगताच त्यांनी इंजिन पोहोचविण्यास नकार दिला. 

टॅग्स :भारतीय रेल्वेचोरी