मुंबई : राज्यासह मुंबईत उन्हाचा पारा वाढतो आहे. अशा स्थितीत राज्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. एकीकडे वाढत्या उष्णतेच्या लाटांचा मतदानावर परिणाम होऊ नये, म्हणून यंदा निवडणूक आयोगाने पावले उचलली आहेत, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर मूलभूत वैद्यकीय सेवा देणारे पथक असणार आहे, शिवाय उमेदवारांनीही कोणती खबरदारी घ्यावी, याविषयी आयोगाने मार्गदर्शन केले आहे.
राज्यात एप्रिलमध्ये वाढते तापमान पाहता आगामी टप्प्यातील मतदानाच्या वेळी प्रत्येक मतदान केंद्रांवर वैद्यकीय पथक असणार आहे.
वैद्यकीय पथकात ३-४ सदस्यांचा समावेश असेल. आपत्कालीन स्थितीत मतदारांना उष्णतेच्या लाटांचा त्रास झाल्यास प्रथमोपचार देण्यात येतील, अशी माहिती मुंबई शहर निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
१) पुरेसे पाणी प्या, सोबत पाण्याची बाटली ठेवा. घरगुती शीतपेयांवर भर देऊन शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचे संतुलन राखा.
२) मोकळे कपडे परिधान करा, टोपी-छत्रीचा वापर करा. लहान मुलांना मतदान केंद्रात आणणे टाळा.
३) पुरेसे पाणी प्या, सोबत पाण्याची बाटली ठेवा. घरगुती शीतपेयांवर भर देऊन शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचे संतुलन राखा.
४) मोकळे कपडे परिधान करा, टोपी-छत्रीचा वापर करा. लहान मुलांना मतदान केंद्रात आणणे टाळा.
मतदान केंद्रासाठी सूचना-
मतदान केंद्र तळमजल्यावर असले पाहिजे. केंद्रांमध्ये पाणी, आवश्यक फर्निचर, प्रकाशयोजना, चिन्हावली, स्वच्छतागृहांच्या सुविधा असल्या पाहिजेत. मतदारांसाठी तंबूची सुविधा असली पाहिजे.