Join us

घरून मतदान करायचंय मग हे वाचाच... 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 10:31 AM

निवडणूक आयोगाने यावेळेस प्रथमच ८५पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी घरूनच मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

मुंबई : निवडणूक आयोगाने यावेळेस प्रथमच ८५पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी घरूनच मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.  त्यानुसार मुंबई दक्षिण मतदारसंघात ४०,०८५ नागरिकांचे ८५ पेक्षा अधिक असून, निवडणूक आयोगाचे कर्मचारी प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन नवीन पर्यायांबाबत माहिती देत आहेत. या मतदारसंघात ८५ पेक्षा अधिक वय असणाऱ्या महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत अधिक आहे. मलबार हिलमध्ये सर्वाधिक वयस्कर नागरिक आढळून आले आहे.

अनेक वेळा वयोवृद्ध नागरिकांना चालता फिरता येत नसल्यामुळे मतदान करता येत नाही. मात्र त्यांचा मतदानाचा हक्क अबाधित राहावा यासाठी निवडणूक आयोगाने घरूनच मतदान करण्याचा नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तो पूर्णपणे ऐच्छिक आहे. घरून मतदान करण्याच्या पर्याय स्वीकारायचा असल्यास त्यांनी तसे कळवावे. त्यानंतर तो पर्याय दिला जाणार आहे. मतदार केंद्रावर मतदानाचा पर्याय दिल्यास तो सुद्धा खुला आहे. 

८५ पेक्षा अधिक वय असणारे-

विधानसभा                  पुरुष      महिला       एकूण

 वरळी                            १६०५      १७४४        ३३४९

शिवडी                          २४५८     २५९३         ५०५१

भायखळा                      २७७९     २८१७        ५५९६

मलबार हिल                  ५१०४     ५८३४         १०९३८

मुंबादेवी                        ३३६३      ३४३५         ६७९८

कुलाबा                         ४०२९      ४३२४          ८३५३

एकूण                           १९३३८     २०७४७     ४००८५

महिलांचे प्रमाण अधिक; मलबार हिलमध्ये सर्वाधिक वयस्कर.

घरून मतदान करणाऱ्यांसाठी...

१) घरून मतदान करणाऱ्यांसाठी टपालपत्रिकेसारखे मतदान करता येणार आहे. 

२)  या सर्व मतदारांची एकत्रित माहिती गोळा करण्याचे काम एप्रिलअखेर सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

३) घरून मतदानाचा पर्याय निवडलेल्या व्यक्तींचा आढावा घेऊन यादी तयार केली जाणार आहे.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४मतदान