अनावश्यक पुस्तकांची विद्यार्थ्यांना सक्ती

By admin | Published: August 23, 2015 01:54 AM2015-08-23T01:54:08+5:302015-08-23T01:54:08+5:30

अनावश्यक पुस्तकांची विद्यार्थ्यांना सक्ती करून त्यांच्या पालकांकडून १ हजार रुपये वसूल केले जात असल्याप्रकरणी शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी येथील पूर्वेकडील सेंट मेरी या इंग्रजी शाळेच्या

Force students with unnecessary books | अनावश्यक पुस्तकांची विद्यार्थ्यांना सक्ती

अनावश्यक पुस्तकांची विद्यार्थ्यांना सक्ती

Next

कल्याण : अनावश्यक पुस्तकांची विद्यार्थ्यांना सक्ती करून त्यांच्या पालकांकडून १ हजार रुपये वसूल केले जात असल्याप्रकरणी शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी येथील पूर्वेकडील सेंट मेरी या इंग्रजी शाळेच्या व्यवस्थापनाला जाब विचारण्यात आला.
गेल्या दोन दिवसांपासून शाळेने पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना ‘स्टुडंट किट’ दिले. यात पाच पुस्तके असून, याची किंमत पालकांकडून
१ हजार रुपये वसूल केली जात आहे. याची तक्रार पालकांनी शिवसेनेचे विभागप्रमुख महेश गायकवाड यांच्याकडे केली होती. शुक्रवारी गायकवाड यांच्यासह पालक आणि शिवसैनिकांनी शाळेत धडक देत तेथील मुख्याध्यापकांशी चर्चा
केली. शैक्षणिकव्यतिरिक्त अनावश्यक पुस्तकांची सक्ती केली जात असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. अखेर, शाळेने माघार घेत चूक मान्य केली आणि स्टुडंट किट परत घेत पालकांचे पैसे परत केले. या वेळी माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे, महेश भोसले, प्रशांत बोटे आणि मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता. (प्रतिनिधी)

Web Title: Force students with unnecessary books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.