पुढील दोन दिवस गारठा कायम राहणार,  हवामान विभागाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 02:15 AM2017-12-16T02:15:35+5:302017-12-16T02:17:53+5:30

शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान १७.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, गुरुवारी हेच तापमान १५.८ अंश नोंदविण्यात आले होते. शुक्रवारी किमान तापमानात दोन अंशाची वाढ झाली असली, तरी पुढील ४८ तास गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.

Forecast for the next two days, forecast for the weather department | पुढील दोन दिवस गारठा कायम राहणार,  हवामान विभागाचा अंदाज

पुढील दोन दिवस गारठा कायम राहणार,  हवामान विभागाचा अंदाज

Next

मुंबई : शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान १७.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, गुरुवारी हेच तापमान १५.८ अंश नोंदविण्यात आले होते. शुक्रवारी किमान तापमानात दोन अंशाची वाढ झाली असली, तरी पुढील ४८ तास गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.
‘ओखी’ चक्रिवादळानंतर मुंबईतील वातावरणात चढ-उतार जाणवू लागले आहेत. वाहणारे गार वारे आणि तापमानात होत असलेली घट, या दोन प्रमुख घटकांमुळे मुंबईतला गारवा कायम आहे. रात्रीसह सकाळी वाहणारे गार वारे थंडीत आणखी भर घालत आहेत. त्यामुळेच शनिवारसह रविवारी किमान तापमान १८ ते २० अंशाच्या आसपास राहील, असे भारतीय हवामान शास्त्र विभागाने सांगितले. परिणामी, पुढचे किमान ४८ तास थंडीचे आहेत.

किमान तापमान
(अंश सेल्सिअस)
औरंगाबाद १६.२
महाबळेश्वर १५.७
नाशिक १३
पुणे १४.६
सातारा १४.५
सोलापूर १६.१
गोंदिया ११.५
नागपूर १४.६
वर्धा १५.५
अहमदनगर १४.७
मालेगाव १५.२
माथेरान १३.५

Web Title: Forecast for the next two days, forecast for the weather department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई