Join us  

मुसळधार पावसाचा अंदाज! मुंबईसह परिसरात रेड अलर्ट, असे असतील पुढचे 5 दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 2:31 PM

मुंबईतील कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंद्धूदुर्गला पुढील पाच दिवसांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. येते काही ठिकाणी रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टदेखील जारी करण्यात आला आहे. 

मुंबई आणि परिसरातील अनेक ठिकाणी बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. आज पाहटेपासून मुसळधार सुरू झाली आहे. याचा वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी होत आहे. मुंबईतील लोकल रेल्वेवरही याचा परिणाम झाला असून १५ ते २० मिनिट उशीराने धावत आहेत. यातच, आता हवामान विभागानेही पावसासंदर्भात पुढील पाच दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे.

मुंबईतील कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंद्धूदुर्गला पुढील पाच दिवसांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. येते काही ठिकाणी रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टदेखील जारी करण्यात आला आहे. 

मुंबई - हवामान विभागाने मुंबईमध्ये आज गुरुवारी रेड अलर्ट, शुक्रवारी ऑरेंज अलर्ट, शनिवारी यलो अलर्ट तर पुढील दोन दिवस ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

पालघर -पालघरचा विचार करता हवामान विभागाने येथे आज गुरुवारी रेड अलर्ट, शुक्रवारी ऑरेंज अलर्ट, शनिवारी यलो अलर्ट तर तर पुढील दोन दिवस ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

ठाणे -हवामान विभागाने ठाण्यात आज गुरुवारी रेड अलर्ट, शुक्रवारी ऑरेंज अलर्ट, तर पुढील तीन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे.

रायगड - हवामान विभागाने रायगडमध्ये आज गुरुवारी आणि उद्या शुक्रवारी रेड अलर्ट, शनिवारी ऑरेंज अलर्ट, तर पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

रत्नागिरी - रत्नागिरीचा विचार करता, हवामान विभागाने येथे आज गुरुवारी ऑरेंज अलर्ट, शुक्रवारी रेड अलर्ट, शनिवारी पुन्हा ऑरेंज अलर्ट तर पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

सिंद्धूदुर्ग - हवामान विभागाने सिंद्धूदुर्गसाठी आज गुरुवारी यलो अलर्ट, शुक्रवारी आणि शनिवारी ऑरेंज अलर्ट, तर पुढील दोन दिवस परत यलो अलर्ट जारी केला आहे.

 

टॅग्स :पाऊसमुंबईठाणे