देशातील गुणवत्तापूर्ण स्वायत्त महाविद्यालयांच्या यादीत मुंबई अग्रस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 03:31 PM2020-04-21T15:31:41+5:302020-04-21T15:55:08+5:30

सेंट झेविअर्स पहिल्या स्थानावर तर मुंबईतील १८ महाविद्यालयांचा पहिल्या शंभरात समावेश

At the forefront of quality autonomous colleges in the country | देशातील गुणवत्तापूर्ण स्वायत्त महाविद्यालयांच्या यादीत मुंबई अग्रस्थानी

देशातील गुणवत्तापूर्ण स्वायत्त महाविद्यालयांच्या यादीत मुंबई अग्रस्थानी

googlenewsNext

 


मुंबई : देशातील स्वायत्त महाविद्यालयांच्या यादीत मुंबईतील सेंट झेविअर्स महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला असून पहिल्या १०० महाविद्यालयांमध्ये मुंबईतील १८  महाविद्यालयांचा समावेश आहे.एज्युकेशन वर्ल्ड इंडिया या खासगी शैक्षणिक संस्थेकडून देशातील उत्तम स्वायत्त महाविद्यालयांची यादी जाहीर करण्यात आली आहे. देशातील पहिल्या पाच महाविद्यालयांत पाचव्या क्रमांकावर मुंबईतील मिठीबाई आणि पोदार महाविद्यालयानी स्थान मिळविले आहे.

एज्युकेशन वर्ल्ड या संस्थेकडून स्वायत्त महाविद्यालयांची क्रमवारी ठरवत असताना शिक्षकांची गुणवत्ता, कॉलेजमधील अभ्यासक्रम आणि शिक्षण, नोकरीच्या संधी पायाभूत सुविधा, नेतृत्त्व आणि प्रशासनाच्या कामाचा दर्जा, विद्यार्थी कल्याण आणि विकास या बाबींच्या आधारे गुणवत्ता ठरवण्यात आली आहे.यानुसार तब्ब्ल २५० महाविद्यालयांची पाहणी करून दर्जा व गुणवत्ता ठरविण्यात आली. त्यानुसार मुंबईतील सेंट झेविअर्स महाविद्यालयाने ७०० पैकी ६३० गुण मिळवीत पहिल्या स्थानावर झेप घेतली. दुसऱ्या स्थानावरील बंगळुरूच्या सेंट जोसेफ महाविद्यालयाला ६२१ गुण तर चौथ्या स्थानावरील माउंट कार्मल महाविद्यालयाला ६०५ गुण मिळाले आहेत. तिसऱ्या स्थानावर चेन्नई येथील मद्रास ख्रिश्चन महाविद्यालयाला ६१६ गुण मिळाले आहेत. पाचव्या स्थानावरील मुंबईच्या मिठीबाई व आर ए पोदार वाणिज्य महाविद्यालयाला ५९७ गुण मिळाले आहेत.

देशाच्या या क्रमवारीत पहिल्या १०० महाविद्यालात राज्यातील ३० महाविद्यालयांचा समावेश असून त्यामध्ये पुणे, नागपूर, वर्धा , सातारा, कोल्हापूर, बारामती , नवी मुंबई, जळगाव, , भुसावळ कराड येथील महाविद्यालयांचा समावेश ही आहे. सगळ्यात महत्ताची बाब म्हणजे पहिल्या १०० महाविद्यालयांत मुंबईतील १८ महाविद्यालयांचा समावेश या क्रमवारीत आहे.
 

-------------------------------

राज्यातील पहिली ५ महाविद्यालये

महाविद्यालये - प्राप्त गुण (७०० पैकी )
सेंट झेवियर्स -६३०
मिठीबाई महाविद्यालय -५९७
आर. ए. पोदार महाविद्यालय - ५९७
एच आर महाविद्यालय -५४०
के. जे. सोमय्या महाविद्यालय  -५३३

Web Title: At the forefront of quality autonomous colleges in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.