विदेशी मद्याचा साठा जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 06:30 PM2019-08-23T18:30:22+5:302019-08-23T18:31:08+5:30

या कारवाईत यादव चालवत असलेल्या वाहनात एक लिटरच्या 30 विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या

Foreign liquor stocks seized; Excise department action | विदेशी मद्याचा साठा जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

विदेशी मद्याचा साठा जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Next

मुंबई - राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुंबईत एका मोठ्या कारवाईत अवैधरित्या विदेशी मद्य बाळगणाऱ्या इसमाला ताब्यात घेतलं आहे...एकूण 63x1000 मी.ली विदेशी मद्यासह 6,26,962 किमतीचा मुद्देमाल उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे.

अजयकुमार हरिष यादव 31 वर्षाचा हा इसम अंधेरी पूर्वेला राहत होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक आर एम भापकर, पी व्ही पाटील, मनेश दराडे व संजीव केंद्रे यांनी विलेपार्ले पूर्व येथे सापळा रचत अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या यादव याला ताब्यात घेतले. या कारवाईत यादव चालवत असलेल्या वाहनात एक लिटरच्या 30 विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या तर राहत्याघरी एक लिटरच्या 33 विदेशी मद्याच्या बाटल्या अश्या एकूण 63 बाटल्या जप्त करण्यात आल्या. यादव या इसमाला बांद्रा न्यायालयात हजर करण्यात आले..न्यायालयाने यादव याला तीन दिवसाची एक्ससाईज कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Foreign liquor stocks seized; Excise department action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.