पोलिसांमुळे वाचले परदेशी छायाचित्रकार तरुणीचे करिअर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 02:01 AM2018-01-18T02:01:15+5:302018-01-18T02:02:29+5:30

नॉर्वेतून एक शिकाऊ फोटोजर्नालिस्ट काही महिन्यांपूर्वी भारतात आली. भारतातील सौंदर्य तिने तिच्या कॅमेºयात टिपले. मुंबईत फिरून तिने मुंबईचे ‘स्पिरिट’ तिच्या कॅमे-यात कैद केले

Foreign photographer's career by policeman reads | पोलिसांमुळे वाचले परदेशी छायाचित्रकार तरुणीचे करिअर

पोलिसांमुळे वाचले परदेशी छायाचित्रकार तरुणीचे करिअर

Next

गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : नॉर्वेतून एक शिकाऊ फोटोजर्नालिस्ट काही महिन्यांपूर्वी भारतात आली. भारतातील सौंदर्य तिने तिच्या कॅमेºयात टिपले. मुंबईत फिरून तिने मुंबईचे ‘स्पिरिट’ तिच्या कॅमे-यात कैद केले. परतीच्या प्रवासाला अवघा एक दिवस असताना, एका रिक्षात ती तिचा कॅमेरा विसरली. ही बाब तिच्या लक्षात आली, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कशीबशी ती साकीनाका पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने रडतच सगळी हकिकत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांना सांगितली, तसेच तिला दुसºया दिवशी परत मायदेशी परतायचे असल्याचेही तिने त्यांना सांगितले. परदेशातील असली, तरी एका विद्यार्थिनीचे भवितव्य दावणीवर लागले होते. त्यातच देशाच्या सन्मानाचाही मुद्दा होताच. त्यामुळे याची दखल घेत धर्माधिकारी यांनी काही विशेष पथकांची नियुक्ती केली. या पथकाने संबंधित परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पडताळण्यास सुरुवात केली. ६ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘त्या’ रिक्षाचा नंबर पोलिसांना सापडला आणि त्यांनी आरटीओच्या मदतीने रिक्षाचालकाला शोधले आणि त्या विदेशी तरुणीचा कॅमेरा तिच्या फ्लाइटच्या अवघ्या दोन तास आधी मिळवून दिला. कॅमेरा हातात मिळताच, त्या तरुणीचा आनंद गगनात मावेनासा झाला. काय बोलावे ते तिला सूचतच नव्हते. तेव्हा पोलिसांना धन्यवाद देत, ‘थँक यू इंस्पेक्टर सर, यू सेव्ह माय करिअर’ इतकेच तिने पोलिसांना म्हटले. ज्याचा उल्लेख तिने विदेशात जाऊनही केला. अशी अनेक उल्लेखनीय कर्तृत्व साकीनाका पोलिसांच्या नावे नोंद आहेत.
कायदा आणि सुव्यवस्था राखताना स्त्रियांना स्वावलंबी बनविणे, लहान मुलांना शिक्षणात रस निर्माण व्हावा, यासाठी उत्तेजनार्थ कार्यक्रम आयोजित करणे, तसेच व्यसनाच्या आहारी जाणाºया मुलांना परावृत्त करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले पोलीस ठाणे म्हणून साकीनाका पोलीस ठाण्याचा उल्लेख केला जातो. अत्यंत संवेदनशील अशा परिसरातही एकोपा टिकवून ठेवण्याचे कौशल्य त्यांना अवगत आहे. त्यामुळेच सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र असले, तरी धर्म, जात, भाषा यावरून या ठिकाणी कधीच वाद होत नाहीत. गेल्या दोन वर्षांत हा एकोपा टिकविण्यासाठी धर्माधिकारी आणि त्यांचे कर्मचारी मेहनत घेत आहेत. यामध्ये ते यशस्वी झाले आहेत. होळी, दिवाळी, ईद, नाताळ, ओणम यांसारखे सण, तसेच प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या ठिकाणी धूमधडाक्यात साजरा केला जातो. सर्व धर्माचे लोक यात सहभागी होतात. त्यात साकीनाका पोलीसही उत्साहाने सहभागी होतात. मोहल्ला कमिटीच्या मॅचेसदेखील तितक्यात खेळकर वृत्तीने खेळल्या जातात. त्यामुळेच ‘विविधतेही एकता’ सांभाळून ठेवण्याचे क्रेडिट आज साकीनाका पोलिसांना जाते.

टिष्ट्वटरवरही ‘टिवटिवाट’
गेल्या वर्षात सर्वात अधिक टिष्ट्वटरवर विविध अ‍ॅक्टिव्हिटिजसाठी चर्चेत असलेल्या पोलीस ठाण्यामध्ये साकीनाका पोलीस ठाण्याचा मान पहिला आहे.

‘पोस्ट’ कार्डमार्फतही आभार!
मुंबईत साकीनाका पोलिसांचे मिळालेले सहकार्य पाहून त्यांना ‘पोस्टकार्ड’मार्फत येणारे धन्यवादही अगणित आहेत.

‘राज’ की बात!
कोणतीही व्यक्ती तक्रार करण्यासाठी आली की, तिची तक्रार घेणे आमचे कर्तव्यच आहे. मात्र, त्याही पूर्वी त्याचे नीट ऐकून घेणे आणि त्याला बोलू देण्याचा आमचा नियम आहे. आपली समस्या कोणीतरी ऐकून घेतेय, हे लक्षात आल्यानंतर समोरचा आपोआपच शांत होतो. त्यामुळे त्याची तक्रार नीट लिहून घेणे शक्य होते. हेच आमच्या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत असल्याचे रहस्य आहे, अन्यथा उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, बजरंग दल, दलित समाज सारख्या सर्वच समाजाचे बांधव या ठिकाणी राहतात. त्यामुळे कोणाच्याही भावना नकळतही दुखावल्या जाणार नाहीत, याची आम्ही काळजी घेतो.
- अविनाश धर्माधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, साकीनाका

लोकसंख्या - ४ लाख
बीट चौकी - ४
मोहिली व्हिलेज, ९० फिट रोड, जरीमरी आणि साकीनाका जंक्शन

Web Title: Foreign photographer's career by policeman reads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस