परदेशी कैदीही झाले कुटुंबीयांशी कनेक्ट; आर्थर रोड कारागृहातून नायजेरियाला पहिला विदेशी व्हिडिओ कॉल 

By मनीषा म्हात्रे | Published: July 13, 2023 06:49 PM2023-07-13T18:49:09+5:302023-07-13T18:49:55+5:30

महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवा विभागाने राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या बंद्यांना कुटुंबियांशी व नातेवाईकांशी संपर्क साधण्याकरीता ई प्रिजन प्रणालीद्वारे व्हिडिओ कॉलिंग सुविधा उपलब्ध करून दिली.

Foreign prisoners also connected with families First foreign video call to Nigeria from Arthur Road Prison | परदेशी कैदीही झाले कुटुंबीयांशी कनेक्ट; आर्थर रोड कारागृहातून नायजेरियाला पहिला विदेशी व्हिडिओ कॉल 

परदेशी कैदीही झाले कुटुंबीयांशी कनेक्ट; आर्थर रोड कारागृहातून नायजेरियाला पहिला विदेशी व्हिडिओ कॉल 

googlenewsNext

मुंबई: कारागृहातील स्थानिक कैद्यांपाठोपाठ विदेशी कैद्यांनाही व्हिडिओ कॉल द्वारे कनेक्ट करण्यास ग्रीन सिग्नल मिळताच, गुरुवारी आर्थर रोड कारागृहातून नायजेरियन कैद्यासाठी थेट नायजेरियातील कुटुंबीयांना व्हिडिओ कॉल द्वारे जोडण्यात आले. मुंबईसह अन्य कारागृहात ही सुविधा लागू करण्यात येत आहे.

महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवा विभागाने राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या बंद्यांना कुटुंबियांशी व नातेवाईकांशी संपर्क साधण्याकरीता ई प्रिजन प्रणालीद्वारे व्हिडिओ कॉलिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र विदेशी कैद्यांना ही सुविधा नव्हती. कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी ४ जुलै रोजी परिपत्रक जारी करत,  पाकिस्तानी,बांग्लादेशी व अतेरिकी कारवायातील बंदी वगळता इतर विदेशी बंद्यांना ही सुविधा देण्याचे निर्देश दिले. 

ज्यातील विविध कारागृहात एकूण ६३७ बंदी दाखल आहेत. विशेषतः मुंबई,नवी मुंबई व इतर शहरातील कारागृहात विदेशी बंद्यांचे प्रमाण अधिक आहे. कारागृहात  विशेषतः नायजेरियन,बांग्लादेशनिया,कोलंबिया, इराण, इराक, ब्रिटन, ग्रीस, गिनी, घाना, ब्राझील, थायलंड, युगांडा, चीन, पाकिस्तान, नेपाळ इत्यादी  देशांचे  कैद्यांचा समावेश आहे. विदेशी कैद्यांचे नातेवाईक अथवा वकील प्रत्यक्ष भेटून मुलाखत घेण्यासाठी येवू शकत नसल्याने विदेशी बंद्यांना कायदेशीर मदत मिळण्यास व कारागृहातून सूटका होण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे विदेशी बंद्यांमध्ये नैराश्य वाढत असल्याने, कारागृह प्रशासनाला सदर बंद्यांवर सतत निगराणी ठेवावी लागते. सदरची सुविधा विदेशी बंद्यांना उपलब्ध करून दिल्याने त्यांना कायदेशीर मदत लवकर मिळेल व कारागृहातून लवकर सुटण्यास मदत होईल. त्यामुळे कारागृहातील कैद्यांची गर्दी थोड्या फार प्रमाणात कमी होण्यास मदत होईल असे कारागृह प्रशासनाने सांगितले.

 आर्थर रोड कारागृहापासून या सुविधेला सुरुवात करण्यात आली. ऑर्थर रोड कारागृहात बंदिस्त असलेला  नायजेरियन कैदी व त्याचे नातेवाईक यांनी सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शनाखाली ई प्रिजन प्रणाली द्वारे कैदी व नातेवाईक मुलाखत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेतली. ही सुविधा यशस्वीपणे विदेशी बंद्यांना लागू करण्याची जबाबदारी कारागृह मुख्यालयाचे विशेष पोलीस महानिरीक्षक 
डॉ जालिंदर सुपेकर हे सांभाळत आहेत. 

 

Web Title: Foreign prisoners also connected with families First foreign video call to Nigeria from Arthur Road Prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई