Join us

परदेशी पाहुणे नको रे बाप्पा!

By admin | Published: April 23, 2017 3:39 AM

राणीबागेतील काचघराबाहेरील गर्दीने पेंग्विन आयात करण्याचा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले आहे. तरीही पालिका अधिकारी नवीन वाद ओढवून घेण्यास तयार नाहीत.

मुंबई : राणीबागेतील काचघराबाहेरील गर्दीने पेंग्विन आयात करण्याचा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले आहे. तरीही पालिका अधिकारी नवीन वाद ओढवून घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे पेंग्विन प्रकरणानंतर परदेशी प्राणी आयात करण्याचा विचार तूर्तास लांबणीवर टाकला आहे.भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयाचे नुतनीकरण करण्यात येत आहे. मात्र गेली अनेक वर्षे संथगतीने सुरु असलेल्या या नुतनीकरणाच्या कामात अनेक अडथळे आले. त्यामुळे वादच अधिक निर्माण झाले. दक्षिण कोरियातून पेंग्विन आयात करणेही असेच पालिकेच्या अंगाशी आले. यामुळे अधिकाऱ्यांनी आता कानाला खडा लावला आहे. सेंट्रल झू आॅथोरिटीला पत्र पाठवून अफ्रिका, आॅस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेतून जिराफ, झेब्रा, चित्ता, कांगारु, काळवीट, शहामृग असे काही प्राणी आणण्याची परवानगी मागितली होती. परंतु पेंग्विन वादानंतर नुतनीकरणाच्या दुसऱ्या टप्यात देशांतर्गत प्राणीसंग्रहालय व अभयारण्यातूनच प्राणी मुंबईत आणण्याचा पालिकेचा विचार सुरु आहे. या अंतर्गत गीर राष्ट्रीय उद्यानातून सिंह आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून चित्ता राणीच्या बागेत आणण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)नूतनीकरणाच्या खर्चात कपातथायलेंडस्थित झेरॉग पार्कच्या धर्तीवर मुंबईतील राणीबागेचे नुतनीकरण करण्यात येत आहे. २००७ मध्ये शिवसेनेने राणी बागेच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव आणला. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत चारशे कोटी रुपये होती. २०१२ पर्यंत या प्रकल्पात तत्कालीन आयुक्त सुबोध कुमार यांनी त्यात कपात करून दीडशे कोटींवर आणले. या प्रकल्पात आणखी ३० कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे. पेंग्विनचा वादमहापालिकेने २५ कोटी रुपये खर्च करून आठ हम्बोल्ट पेंग्विनची खरेदी केली, या पेंग्विनला भायखळा येथील राणीच्या बागेतील प्राणी संग्रहालयात ठेवण्यात आले होते. त्यापैकी २३ आॅक्टोबरला एका पेंग्विनचा मृत्यू झाला, पेंग्विनच्या मृत्युचे प्रकरण विरोधकांनी चांगलंच लावून धरला आहे. बोगस कागदपत्र सादर करून त्यावर कंत्राटदाराने सहीच केली नसल्याचेही उजेडात आले. दुसऱ्या ठेकेदाराचा शोधसंग्रहालय प्राधिकरणाने गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे. पालिकेतील विरोधी पक्षनेत्यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली असून, लोकायुक्त कार्यालयाने राणीबागचे उपअधीक्षक डॉ. संजय त्रिपाठी यांना समन्स बजावले होते. सध्या लोकायुक्तांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पेंग्विनच्या काचघराचे काम करणाऱ्या कंपनीचे कंत्राट रद्द केल्यानंतर महापालिका दुसऱ्या ठेकेदाराच्या शोधात आहे. नव्या प्राण्यांसाठी नवा ठेकेदार पिंजरे तयार करणार आहे. यासाठी १२० कोटी रुपयांच्या कामाचा निविदा काढण्यात येत आहे.यासाठी नको परदेशी पाहुणे परदेशी प्राणी आयात करण्यासाठी बऱ्याच तांत्रिक अडचणी व आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करणे बंधनकारक ठरते. पेंग्विन आयात करताना काही महत्वपूर्ण नियमांचे उल्लंघन झाले होते.त्यामुळे परदेशी प्राणी आयात करण्याबाबत पालिका अधिकारी पुर्नविचार करीत असून देशांतर्गत प्राणी घेण्यावर भर देण्यात येत असल्याचे पालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले. तिसऱ्या टप्प्यात परदेशी प्राणी घेण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.मफतलाल मिल येथील सात एकर जागेवर या परदेशी पाहुण्यांसाठी घर तयार करण्यात येणार होते. यामध्ये आॅस्ट्रेलियातील कांगारु, अफ्रिकेतील पाणगेंडा, जिराफ, झेब्रा, शहामृगांचाही समावेश होता.