फॉरेन्सिक आॅडोंटोलॉजी भारतात अद्याप अपरिपक्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 05:51 AM2018-06-25T05:51:26+5:302018-06-25T05:51:28+5:30
केवळ भारतातच नव्हे, तर जगातील अन्य सात देशांमध्ये फॉरेन्सिक दंतवैद्यक तज्ज्ञांची निर्मिती करण्याची गरज आहे. पीडितांची ओळख पटविण्यासाठी ‘फॉरेन्सिक आॅडोंटोलॉजी’ ही सर्वात प्रभावी
मुंबई : केवळ भारतातच नव्हे, तर जगातील अन्य सात देशांमध्ये फॉरेन्सिक दंतवैद्यक तज्ज्ञांची निर्मिती करण्याची गरज आहे. पीडितांची ओळख पटविण्यासाठी ‘फॉरेन्सिक आॅडोंटोलॉजी’ ही सर्वात प्रभावी
पद्धत आहे. त्यामुळे ही गरज ओळखून मानवी हक्कासाठी न्यायवैद्यक दंततज्ज्ञगट स्थापन केला आहे. दुर्दैवाने भारतात या क्षेत्रातील तज्ज्ञांचा खूपच तुटवडा आहे. या गटात आता विविध ४७ देशांमधील १०० सल्लागार कार्यरत असून, न्यायवैद्यक दंतवैद्यकशास्त्राच्या माध्यमातून पीडितांची ओळख पटविण्यासाठी प्रभावी माध्यमांना चालना
देण्याचे काम करण्यात येते, असे प्रतिपादन इटलीचे फॉरेन्सिक आॅडोंटोलॉजिस्ट डॉ. एमिलीओ न्युझोलीज यांनी केले.
इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए)तर्फे ‘आपत्तीमध्ये बळी गेलेल्यांची ओळख पटविणे’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एका परिसंवादात इटलीचे डॉ. एमिलीओ न्युझोलीज आणि केईएम रुग्णालयाच्या न्यायवैद्यक दंतशास्त्रज्ञ डॉ. हेमलता पांडे यांनी उपस्थित असलेल्या दंततज्ज्ञ डॉक्टर व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
केईएम रुग्णालय, तसेच शेठ जी.एस. मेडिकल कॉलेजमधल्या फॉरेन्सिक मेडिसिन खात्यातील न्यायवैद्यक दंततज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. हेमलाता पांडे म्हणाल्या की, आपत्तीमधील पीडितांची ओळख पटविण्यासाठी फॉरेन्सिक आॅडोंटोलॉजी ही सर्वात वेगवान आणि स्वस्त प्रक्रिया असून, ती डीएनए प्रक्रियेच्या तुलनेत वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली प्रक्रिया आहे.
त्या म्हणाल्या की, फॉरेन्सिक आॅडोंटोलॉजी स्वस्त आणि वेगवान प्रक्रिया असली, तरी सध्याच्या
घडीला भारतात केवळ तीन ते चार फॉरेन्सिक आॅडोंटोलॉजी आहे. या क्षेत्रात अधिकाधिक तज्ज्ञ निर्माण व्हावेत, यासाठी सर्व तºहेचे प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे, फॉरेन्सिक आॅडोंटोलॉजी या
विषयाचा दंत अभ्यासक्रमात समावेश करण्याची गरज असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यासाठीच इंडियन
डेंटल असोसिएशन फॉरेन्सिक आॅडोंटोलॉजीसारख्या या नव्या क्षेत्रात तज्ज्ञ निर्माण व्हावेत, यासाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू करीत आहे. मानवी अवशेषांची ओळख पटविणे, मोठ्या प्रमाणावरील मृतदेहांची ओळख पटविणे, अंगावरील व्रणांच्या जखमांचे मूल्यमापन, शोषण प्रकरणांचे मूल्यमापन, वयाचा अंदाज, गैरव्यवहार प्रकरणे या सारख्या प्रमुख सात क्षेत्रांमध्ये फॉरेन्सिक आॅडोंटोलॉजी जबाबदार ठरू शकते, असे डॉ हेमलता पांडे यांनी सांगितले.