बार, हुक्का नोंदणीप्रकरणी होणार फॉरेन्सिक ऑडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 05:26 AM2019-03-29T05:26:07+5:302019-03-29T05:26:17+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्या नावांसह त्यांच्या कार्यालयाच्या पत्त्यावर दुकाने आणि आस्थापना प्रमाणपत्र नोंदणी झाल्याचे पडसाद गुरुवारी महापालिका सभागृहात उमटले.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्या नावांसह त्यांच्या कार्यालयाच्या पत्त्यावर दुकाने आणि आस्थापना प्रमाणपत्र नोंदणी झाल्याचे पडसाद गुरुवारी महापालिका सभागृहात उमटले. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणी फॉरेन्सिक आॅडिट करण्यात येणार असून, त्याचा अहवाल सभागृहात सादर केला जाईल. पालिकेच्या दुकाने व आस्थापनासाठी मुख्यमंत्री आणि आयुक्तांच्या नावे अनुक्रमे बीयर बार आणि हुक्का पार्लरची आॅनलाइन नोंदणी करण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकरणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्त यांचे पद लक्षात घेता रवी राजा यांच्या मागणीला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. ‘इज आॅफ डुइंग बिझनेस’अंतर्गत महापालिकेचा आॅनलाइन प्रमाणपत्र प्रक्रियेतील गोंधळ समोर आला होता. पालिकेने अनुक्रमे माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशन व गावदेवी पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याकरिता तक्रार अर्ज दिला होता.