फॉरेन्सिक अहवालाने उलगडले हत्या प्रकरण, आत्महत्या केलेल्या पतीवर ४ वर्षांनी गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 02:12 PM2024-08-10T14:12:55+5:302024-08-10T14:13:51+5:30

२६ ऑगस्ट २०२० रोजी कांदिवली पश्चिम येथील महावीरनगर भागातील सुनीता अपार्टमेंटच्या नवव्या मजल्यावरील दोन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये दोशी दाम्पत्य मृतावस्थेत आढळले होते.

Forensic report unravels murder case | फॉरेन्सिक अहवालाने उलगडले हत्या प्रकरण, आत्महत्या केलेल्या पतीवर ४ वर्षांनी गुन्हा 

फॉरेन्सिक अहवालाने उलगडले हत्या प्रकरण, आत्महत्या केलेल्या पतीवर ४ वर्षांनी गुन्हा 


मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील एका इमारतीमध्ये २०२० मध्ये स्टॉक ट्रेडर जिग्नेश दोशी (४५) आणि त्याची पत्नी कश्मिरा (४३) हे मृतावस्थेत आढळले होते. याप्रकरणाचा फॉरेन्सिक अहवाल चार वर्षांनी मिळाल्यानंतर जिग्नेशनेच आपल्या पत्नीची हत्या करून आत्महत्या केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी जिग्शेनविरोधात शुक्रवारी खुनाचा गुन्हा दाखल केला.

२६ ऑगस्ट २०२० रोजी कांदिवली पश्चिम येथील महावीरनगर भागातील सुनीता अपार्टमेंटच्या नवव्या मजल्यावरील दोन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये दोशी दाम्पत्य मृतावस्थेत आढळले होते. यावेळी लॉकडाऊनमुळे दोशीवर आर्थिक ताण आला होता. दोशी यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत या घटनेसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असा दावा करत आपल्या मुलासाठी काहीही न ठेवल्याबद्दल माफी मागितली होती.

खून आणि आत्महत्येचे समर्थन करणारे कोणतेही स्पष्टीकरण आणि थेट पुरावे तसेच साक्षीदार नसल्यामुळे पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबमध्ये नमुने पाठवले होते. अखेर फोरेन्सिक अहवालानंतर दोशी यांच्या मृत्यूची वेळ त्यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर असल्याची पुष्टी झाली. मात्र दोषी व्यक्ती हयात नसल्यामुळे लवकरच न्यायालयात हत्येचा गुन्हा दाखल करणार असल्याचे कांदिवली पोलिसांकडून सांगण्यात आले. जिग्नेश याने आधी पत्नीचा कपड्याने गळा आवळून खून केला आणि नंतर बाथरूममध्ये स्वत:च्या डाव्या हाताचे मनगट कापले, असा संशय पोलिसांना आहे.

Web Title: Forensic report unravels murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.