पोलिस भरतीबाबतचे ‘ते’ परिपत्रक बनावट, मरीन ड्राइव्ह पोलिसांकडून गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 09:01 AM2022-11-17T09:01:04+5:302022-11-17T09:01:54+5:30

Police Recruitment: महाराष्ट्र पोलिस भरतीबाबतच्या अधिसूचनेत बदल करत बनावट परिपत्रक व्हायरल केल्याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Forgery of circular regarding police recruitment, case filed by Marine Drive Police | पोलिस भरतीबाबतचे ‘ते’ परिपत्रक बनावट, मरीन ड्राइव्ह पोलिसांकडून गुन्हा दाखल

पोलिस भरतीबाबतचे ‘ते’ परिपत्रक बनावट, मरीन ड्राइव्ह पोलिसांकडून गुन्हा दाखल

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्र पोलिस भरतीबाबतच्या अधिसूचनेत बदल करत बनावट परिपत्रक व्हायरल केल्याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
गृहविभागाचे सचिव अनिल कुलकर्णी (५६) यांच्या फिर्यादीवरून पोलिस अधिक तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलिस भरतीसंबंधित चुकीचे परिपत्रक व्हायरल होत असल्याची  माहिती त्यांना मिळाली. याबाबतची प्रत मिळताच ती बनावट असल्याचे दिसून आले. 
त्यांनी तात्काळ मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात शासनाची फसवणूक करून, उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा नोंदवत पोलिस अधिक तपास करत आहे. 

Web Title: Forgery of circular regarding police recruitment, case filed by Marine Drive Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.