Join us  

मनपा कर्मचारी, निवृत्तीवेतन धारकांसाठी फॉर्म-१६ हा ३१ मार्च, २०२१ पर्यंत उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 4:25 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कर्मचारी तथा निवृत्तीवेतन धारक यांना २०१९-२०चे आयकरविषयक प्रपत्र-१६ ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कर्मचारी तथा निवृत्तीवेतन धारक यांना २०१९-२०चे आयकरविषयक प्रपत्र-१६ ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रपत्रे कोणत्याही इंटरनेट ब्राउझरचा उपयोग करून प्राप्त करता येईल. ब्राउझर ओपन केल्यानंतर http://form16.mcgm.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करावे. चौकोनामध्ये पॅन क्रमांकाची नोंद करावी, नंतर सबमिटवर क्लिक करावे.

फॉर्म-१६ दोन भागांमध्ये दिसेल. भाग अ हा २०१९-२० मध्ये वजा केलेल्या आयकराशी संबंधित आहे. भाग ब हा २०१९-२० मधील उत्पन्न, गुंतवणूक व त्यावरील आयकर यांचा तपशील आहे. त्यानंतर, डाऊनलोडवर क्लिक करावे. भाग अ मधील एकूण वजा केलेली आयकराची रक्कम, भाग ब मध्ये नमूद केलेल्या देय आयकराच्या रकमेतून वजा करून योग्य ती आयकर देय किंवा परताव्याची रक्कम मिळवावी आणि निर्धारित वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न आयकर खात्याला सादर करावे. प्रपत्र-१६ ३१ मार्च, २०२१ पर्यंत उपलब्ध राहील.

२०२०-२१ करिता निवृत्तीवेतनधारकांनी केलेल्या आयकर बचतीच्या गुंतवणुकीची कागदपत्रे, तसेच गृहकर्ज घेतले असल्यास निवृत्तीवेतनधारकांनी प्रपत्र १२ बीबी हे www.incometaxindia.gov.in या साइटवर जाऊन डाऊनलोड करावे. डाऊनलोड केलेले फॉर्म वित्तीय संस्थेच्या पॅन क्रमांकासह सर्व माहिती प्रपत्र-१२ बीबीमध्ये नमूद करुन ते निवृत्तीवेतन (आयबी) विभाग, ई विभाग कार्यालय, भायखळा (पश्चिम) येथे सादर करावे.