Join us

टीआरपी घोटाळाप्रकरणी बीएआरसीच्या माजी सीईओला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : टीआरपी घोटाळाप्रकरणी बीएआरसीच्या माजी सीओओच्या अटकेपाठोपाठ गुरुवारी माजी सीईओ पार्थो दासगुप्ताला पुण्यातून अटक करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : टीआरपी घोटाळाप्रकरणी बीएआरसीच्या माजी सीओओच्या अटकेपाठोपाठ गुरुवारी माजी सीईओ पार्थो दासगुप्ताला पुण्यातून अटक करण्यात आली. या प्रकरणातील ही १५वी अटक असून, गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक (सीआययू) अधिक तपास करत आहे.

टीआरपी घोटाळाप्रकरणी गेल्या आठवड्यात बीएआरसीचे माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) रोमील रामगडिया (४०) यांना मुंबईतून अटक करण्यात आली. रोमील यांनी बीएआरसीमध्ये उपलब्ध गोपनीय, संवेदनशील माहिती एआरजी आऊटलायर कंपनीला पुरवून रिपब्लिक वृत्त वाहिन्यांचा टीआरपी वाढविण्यात सहकार्य केले. एआरजी आऊटलायर कंपनीचे संचालक, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतचे व्हॉट्सअ‍ॅप संभाषण हाती लागले आहे. त्यानुसार रोमील यांच्यावर कारवाई करण्यात आली.

रोमील यांच्या चौकशीतून दासगुप्ताचा सहभाग समोर आला. त्यानुसार अधिक तपास सुरू असताना गुरुवारी पुणे ग्रामीण येथील राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्याला अटक करण्यात आली. दासगुप्ता यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात स्वेच्छानिवृत्ती घेतली. यात त्यांच्यासह आणखी किती जणांचा सहभाग आहे? याबाबत अधिक तपास सुरू आहे. शुक्रवारी दासगुप्ता यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

...............................................