शिवसेनेत जोरदार इनकमिंग; माजी आमदार हेमेंद्र मेहता यांचा भाजपाला रामराम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 09:01 PM2021-02-06T21:01:58+5:302021-02-06T21:24:39+5:30
भारतीय जनता पार्टीला बोरीवलीत खिंडार पडले असून मेहता यांच्या प्रवेशाने शिवसेनेला बोरीवलीत अधिक मजबूती येईल अशी चर्चा आहे.
मनोहर कुंभेजकर
मुंबई: सध्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे. पक्षनेतृत्वावर नाराज असणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी काल भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आज सायंकाळी भाजपाचे माजी आमदार हेमेंद्र मेहता यांचा भाजपाला रामराम ठोकला. भारतीय जनता पार्टीला बोरीवलीत खिंडार पडले असून मेहता यांच्या प्रवेशाने शिवसेनेला बोरीवलीत अधिक मजबूती येईल अशी चर्चा आहे.
भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता जी यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/243jdXmd2i
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) February 6, 2021
बोरीवली विधानसभेचे सलग तीन वेळा निवडून आलेले माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी आज सायंकाळी वर्षा बंगल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापासून मुंबईमध्ये भाजपा पक्ष वाढीसाठी झटणारे, सध्याच्या भाजपाच्या नेतृत्वावर नाराज असणारे हेमेन्द्र मेहता यांची पक्षात घुसमट होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, आमदार व विभागप्रमुख विलास पोतनीस, युवासेना सचिव वरूण सरदेसाई हे देखील उपस्थित होते.