Join us  

माजी सनदी अधिकारी शर्वरी गोखलेंचे निधन

By admin | Published: January 16, 2016 1:18 AM

माजी सनदी अधिकारी शर्वरी गोखले (६५) यांचे आज कर्करोगाने पुण्यात निधन झाले. एक आदर्श सनदी अधिकारी असा त्यांचा लौकिक होता. अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य)

मुंबई : माजी सनदी अधिकारी शर्वरी गोखले (६५) यांचे आज कर्करोगाने पुण्यात निधन झाले. एक आदर्श सनदी अधिकारी असा त्यांचा लौकिक होता. अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) या पदावरून त्या निवृत्त झाल्या होत्या. १९७४मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत आलेल्या गोखले यांनी महाराष्ट्रात आयुक्त, सचिव, प्रधान सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून विविध खात्यांमध्ये सेवा दिली. २००९-१०मध्ये राज्यात आलेल्या स्वाइन फ्लूच्या साथीदरम्यान त्यांनी केलेले नियोजन महत्त्वपूर्ण होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोखले यांच्या निधनाबद्दल तीव्रदु:ख व्यक्त केले आहे. राज्यानेएक लोकाभिमुख प्रशासक गमावला, असे त्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. शर्वरी गोखले यांच्या दीर्घकाळ सहकारी राहिलेल्या माजी सनदी अधिकारी चंद्रा अय्यंगार म्हणाल्या की, कुणाच्याही दबावासमोर न झुकता निर्भीड आणि पारदर्शक निर्णय घेण्याचा गोखले यांचा स्वभाव होता. लोकाभिमुख निर्णय लवकर झाले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असायचा. (विशेष प्रतिनिधी)