माजी सरन्यायाधीश सरोश कपाडिया यांचे निधन
By admin | Published: January 5, 2016 05:14 PM2016-01-05T17:14:31+5:302016-01-05T17:14:31+5:30
सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश सरोश कपाडिया यांचे मंगळवारी सकाळी मुंबईतील खासगी रुग्णालयात निधन झाले.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश सरोश कपाडिया यांचे मंगळवारी सकाळी मुंबईतील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि तत्वनिष्ठ अशी त्यांची ओळख होती.
के.जी.बालक्रृष्णन यांच्यानंतर ते भारताचे सरन्यायाधीश बनले. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाचे निकाल दिले. यात वोडाफोन खटल्याचाही समावेश आहे. प्रामाणिकपणा ही त्यांची मुख्य ओळख होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका गरीब पारसी कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
लॉ फर्ममधून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. शिस्तप्रिय आणि कामात जपलेली नैतिकता यामुळे न्यायव्यवस्थेत त्यांनी सर्वोच्चपद भूषवले. सप्टेंबर २०१२ मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांनी कुठलेही पद किंवा समितीमध्ये पद भूषवले नाही.