उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल; एकनाथ शिंदेंही बीकेसीत पोहचले, थोड्याच वेळात तोफ धडाडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 07:30 PM2022-10-05T19:30:41+5:302022-10-05T19:35:23+5:30

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झाले आहेत.

Former Chief Minister and Shiv Sena party chief Uddhav Thackeray has entered Shivtirtha. | उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल; एकनाथ शिंदेंही बीकेसीत पोहचले, थोड्याच वेळात तोफ धडाडणार

उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल; एकनाथ शिंदेंही बीकेसीत पोहचले, थोड्याच वेळात तोफ धडाडणार

googlenewsNext

मुंबई- दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटाने आपापले मेळावे तुफान गर्दीचे करण्यासाठी कंबर कसली असून, जास्त गर्दी कोणाच्या मेळाव्यात होणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर होणार असून, त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक पोहचले आहेत. 

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे देखील शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बीकेसी मैदानावर होत असलेल्या दसरा मेळाव्यासाठी पोहचले आहेत. 

'जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे'; दसरा मेळाव्याच्या भाषणाआधी एकनाथ शिंदेंचं सूचक ट्विट

शक्तिप्रदर्शनाची ही कांटे की टक्कर कोण जिंकणार, हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ठाकरे, शिंदे एकमेकांना जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदेंच्या होत असलेल्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची खुर्ची ठेवण्यात आली आहे. तसेच या खुर्चीच्या बाजूला बाळासाहेबांची सावली समजले जाणारे चरणसिंग थापा उभे राहणार असल्याची माहितीही समोर येत आहे. चरणसिंग थापा यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केले होता.

शिवतीर्थावरील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर देखील शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या नावाची खुर्ची ठेवण्यात आली आहे. याआधी देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या मेळाव्यात संजय राऊत यांच्या नावाची रिकामी खुर्ची व्यासपीठावर ठेवली होती. तसेच संजय राऊत एकटे लढत आहेत, मोडेन पण वाकणार नाही, असा आमचा संजय आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी कौतुक केले होते.

शिंदे समर्थकांची गर्दी! मेळाव्याआधी 'या' गोष्टीत वरचढ ठरले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

'आम्ही तुमचा आजही आदर करतो, पण...'

मेळाव्यात बोलताना शहाजीबापू म्हणाले, 'शिवसेनेने भाजपसोबत निवडणूक लढवली होती. सगळीकडे भाजसोबत मते मागितली, लोकांनीही आम्हाला भरभरुन मतदान केले. पण, निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसले. ज्या शरद पवारांवर आणि सोनिया गांधींवर बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर टीका केली, त्या शरद पवारांसोबत आणि सोनिया गांधींसोबत तुम्ही आघाडी केली. बाळासाहेबांच्या कुंटुबातील असल्यामुळे आम्ही आजही तुमचा आदर करू. पण, एखाद्या मेलेल्या कुत्र्याला जस फरपटत नेऊन कचऱ्यात फेकतात, तसचं तुम्ही आम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत नेले. हे आम्ही कधीही विसरू शकत नाही,' असे शिंदे गटातील आमदार शहाजीबापू म्हणाले. 

Web Title: Former Chief Minister and Shiv Sena party chief Uddhav Thackeray has entered Shivtirtha.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.