मुंबई: गेल्या महिन्याभरापासून राजकीय घडामोडींना वेग आला होता. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर विधानसभेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडीने बहुमत ठराव जिंकला. 169 आमदारांचा सरकारच्या बाजूने मतदान केले. भाजपाने मात्र सुप्रीम कोर्टाचे आदेश, नियमांची पायमल्ली होत असलेल्या सभागृहात आम्ही बसणार नाही असा निर्णय आम्ही घेत सभात्याग केल्याने ठरावाच्या विरोधात शून्य मतदान झाले.
शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या भूमिकेवर अडून राहिल्यानंतर भाजपाचे अध्यक्ष अमित शहाउद्धव ठाकरे यांची भेट घेऊन समजूत काढतील असा अंदाज बांधला जात होता. परंतु अमित शहा व उद्धव ठाकरे यांची कोणतीच भेट व चर्चा न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. मात्र आज विधानसभेत महाविकासआघाडीच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अमित शहा आज (शनिवारी) मुंबईत दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकादा चर्चा रंगू लागली आहे.
अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली आहे. शनिवारी दुपारी 2 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनात आधी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील सदस्य यांचा परिचय झाला. भाजपा आमदारांकडून सभागृहात गदारोळ केला व त्यानंतर भाजपाने सभात्याग करत विश्वासदर्शक ठरावावर बहिष्कार टाकला.
169 आमदारांचा सरकारच्या बाजूने मतदान केले. भाजपाने सुप्रीम कोर्टाचे आदेश, नियमांची पायमल्ली होत असलेल्या सभागृहात आम्ही बसणार नसल्याचे सांगत सभात्याग केल्याने विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात शून्य मतदान झाले. तसेच मनसे, एमआयएम आणि सीपीआयएम यांचे एकूण चार आमदारांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.