जर तुम्ही खरे सावरकर प्रेमी असाल तर...; उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना खुले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 05:34 PM2023-06-18T17:34:52+5:302023-06-18T17:38:31+5:30

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले.

Former Chief Minister Uddhav Thackeray criticized Deputy Chief Minister Devendra Fadnavis | जर तुम्ही खरे सावरकर प्रेमी असाल तर...; उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना खुले आव्हान

जर तुम्ही खरे सावरकर प्रेमी असाल तर...; उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना खुले आव्हान

googlenewsNext

मुंबई- कर्नाटक राज्यात सत्तांतर होताच काँग्रेस सरकारने भाजप सरकारने घेतलेले काही निर्णय फिरवण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने भाजपा सरकारने आणलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द केला. तसेच सावरकरांचा धडाही अभ्यासक्रमातून वगळला. यावरून भाजप आक्रमक झाली असून, जोरदार टीका करण्यात येत आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरेंना सवाल केला होता. यावर आज प्रत्युत्तर देताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे. 

'सत्तेच्या मस्तीचा फुगलेला फुगा फोडायला वेळ लागणार नाही'; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्रजी तुमची परिस्थीती खूप हालाखीची आहे, तुम्ही बोलताय ते ठिक आहे. तुमचे अपमान होत आहेत. ते तुम्हाला सहन होत नाही आणि सांगताही येत नाही कारण वरुन आदेश आहे, असा टोला लगावला. सावरकरांचा धडा वगळला याचा निषेध आम्ही करतोच. पण ज्या सावरकरांनी स्वातत्र करण्यासाठी कष्ट केले. कष्ट करुन देश स्वतंत्र केला. तो देश आता ज्याचा स्वातंत्र्य संग्रामात कोणताही काडीचा संबंध नव्हता ती लोक आता देश आपल्या जोखडाखाली आणण्याचा प्रयत्न करत आहे, जर तुम्ही खरे सावरकर प्रेमी असाल तर तुम्ही तुमच्या नेत्यांचा धिक्कार करा, हिंमत असेलतर करुन दाखवा, असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिले. 

"तुमची सत्तेची मस्ती दाखवायची असेल तर ती मस्ती मनीपुरमध्ये दाखवा. तिकडे ईडी, सीबीआयचे लोक पाठवा. अमित शहांना सुद्धा लोक जुमानत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी मनीपुरमध्ये जायला तयार नाहीत पण अमेरिकेत जायला तयार आहेत. पीएम मोदींनी एकदा मनीपुरमध्ये जाऊनच दाखवावं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

उद्धव ठाकरे म्हणाले, ठाण्यात महिला गुंड तयार झालेत. महिला नेत्यांवर हल्ले केले जातात. आता इथून पुढे असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. शिवसेने पुढील हे आव्हान पहिलं नाही, याअगोदरही अशी आव्हान आम्ही पाहिले आहेत.  उद्या शिवसेना वर्धापन दिन आहे आणि परवा गद्दार दिन आहे, असा टोलाही ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला. 

Web Title: Former Chief Minister Uddhav Thackeray criticized Deputy Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.