आई- वडिलांची शपथ घेऊन सांगतो, अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद ठरलं होतं- उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 08:16 PM2022-10-05T20:16:10+5:302022-10-05T20:22:03+5:30
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई- सभेनंतर परंपरेनुसार रावण दहन करणार आहोत. यावेळेचा रावण वेगळा आहे. काळ बदलतो तसा रावणही बदलतो. आत्तापर्यंत दहा तोंडाचा होता. आता ५० खोक्यांचा खोकासूर, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
शिवसेना ही एकट्या दुकट्याची नाही. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात, तोपर्यंत मी पक्षप्रमुख आहे. एक जरी निष्ठावंत शिवसैनिक उठून बोलेन गेट आउट...मी असाच पायऱ्या उतरून घरी निघून जाईन, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच हॉस्पिटमध्ये असताना ज्यांच्यावर जबाबदारी दिली ते कटाप्पा कट करत होते. हा पुन्हा उभा राहूच कसा शकणार नाही. पण त्यांना कल्पना नाही, हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आता रावण वेगळा आहे, आता 50 खोक्यांचा 'खोकासूर' आलाय; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर बाण...
माझ्या शक्तीशी पंगा घेतलेला आहात, देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही. तेजाचा शाप आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील निशाणा साधला. अमित शाह म्हणाले की शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत काही ठरलं नव्हतं. मात्र मी शिवरायांच्या साक्षीने, आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो. अडीच-अडीच वर्षं मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायची हे ठरलं होतं. अडीच वर्षं भाजपा - अडीच वर्षं शिवसेनेची हेच तेव्हा सांगत होतो. आत्ता केलं, ते तेव्हा का नाही?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
दसरा मेळावा २०२२ | छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर - LIVE https://t.co/QugwdkMkM1
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) October 5, 2022
एकही माणूस इकडे भाड्याने आणलेला नाही. तासाची बोली लावून आणलेला नाही. तिकडे एक-एक-एक, इकडे एकनिष्ठ आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. कोणताही अनुभव नव्हता, पाठी तुमचं प्रेम आशीर्वाद होता. त्याच्या जोरावर अडीच वर्षं कारभार करून दाखवला, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. शिंदे गटातील आमदार आणि खासदार यांना गद्दार म्हणत टीकास्त्र सोडलं. आम्ही गद्दारच म्हणणार..कपाळीचा गद्दार हा शिक्का पुसता येणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.