शिवसेनेच्या इतिहासात एकच दसरा मेळावा; उद्धव ठाकरेंनी ठणकावलं, एकनाथ शिंदेंना डिवचलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 04:26 PM2022-09-30T16:26:42+5:302022-09-30T16:32:10+5:30

यंदाचा दसरा मेळावा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी महत्त्वाचा आहे.

Former Chief Minister Uddhav Thackeray has said that there is only one Dussehra Melava in the history of Shiv Sena. | शिवसेनेच्या इतिहासात एकच दसरा मेळावा; उद्धव ठाकरेंनी ठणकावलं, एकनाथ शिंदेंना डिवचलं!

शिवसेनेच्या इतिहासात एकच दसरा मेळावा; उद्धव ठाकरेंनी ठणकावलं, एकनाथ शिंदेंना डिवचलं!

googlenewsNext

मुंबई- यंदाचा दसरा मेळावा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्हीं गटाकडून राज्यातून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयात ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे तर दुसरीकडे शिंदे देखील बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. 

शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दीड लाखांपर्यंत शिवसैनिकांची गर्दी जमण्याची योजना आखण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांमधून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. तर शिवसैनिकांच्या स्वागताची जबाबदारी मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे. न भूतो न भविष्यति असा दसरा मेळावा भरवा, असा आदेश माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

निष्ठेचा सागर उसळणार... शिंदे गटाला ठाकरेंचंही टीझरनेच उत्तर, दसरा मेळाव्याची भगवी गर्जना

आज देखील उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यावर भाष्य केलं आहे. शिवसेना एकच आहे. शिवसेनेच्या इतिहासात एकच दसरा मेळावा होतो, तो म्हणजे शिवाजी पार्कवर, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून आज बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज व राज्यातील बंजारा समाजाच्या प्रमुख सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. 

दरम्यान, शिंदे गटातील सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघातून मोठया प्रमाणात सभेसाठी कार्यकर्त्यांना घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकट्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघासाठी ३०० एसटी बुक केल्याची माहिती आहे. तर शिंदे गटातील आमदारांकडून जवळपास ४ हजार ५०० गाड्यांची मागणी महामंडळाकडे केल्याची माहिती आहे. तसेच शिंदे गट हे पाच लाख लोकांना बीकेसी इथे आण्याचा प्रयत्न करत आहे.

शिंदे गटाला ठाकरेंचंही टीझरनेच उत्तर-

निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची ताकद दिसणार या टॅगलाईनसह शिवसेनेने हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्यातील सभेचे जुने फोटो दिसून येतात. त्यामध्ये, बाळासाहेब शिवसैनिकांना संबोधित करतानाचे छायाचित्र आहे. तसेच, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो या आवाजातील उद्धव ठाकरेंचा संवाद, त्यांच्या सभांचे व्हिडिओ आणि डौलात फडकणारा भगवा ध्वज दिसून येत आहे. एकीकडे शिंदे गटाने टिझर लाँच केल्यानंतर आता ठाकरे गटानेही टिझर लाँच करत निष्ठेचा सागर उसळणार असल्याचे म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Former Chief Minister Uddhav Thackeray has said that there is only one Dussehra Melava in the history of Shiv Sena.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.