Join us

देवेंद्र फडणवीससाहेब काळजी घ्या अन् कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हा; रोहित पवारांच्या सदिच्छा

By मुकेश चव्हाण | Published: October 24, 2020 7:18 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी देखील ट्विट करत देवेंद्र फडणवीसांना सदिच्छा दिल्या आहे.

मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली असून आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. तसेच, माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांना, कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी क्वारंटाईन व्हावे, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

 

देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण झाल्यानंतर राज्यातील सर्व नेते त्यांना काळाजी घेण्याचे मेसेज करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी देखील ट्विट करत देवेंद्र फडणवीसांना सदिच्छा दिल्या आहे. देवेंद्र फडणवीस साहेब काळजी घ्या, आणि कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हा. माझ्या सदिच्छा आपल्यासोबत आहेत, असं रोहित पवारांनी ट्विट केलं आहे. 

देवेंद्र फडणवीस हे सध्या बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहार दौऱ्यावर आहेत. मात्र, गेल्या 4 दिवसांपासून ते महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा करत होते. ''लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी !, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

कोरोना कालावधीत फडणवीसांचे दौरे

राज्यातील कोरोना परिस्थिती, रुग्णांलयामध्ये मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसांपासून राज्यभर फिरत आहेत. या माध्यमातून ते पालिका आणि आरोग्य प्रशासनातल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. कोविड रुग्णालयांना भेटी देऊन ते स्वत: परिस्थितीची पाहणी करत होते फडणवीस यांच्या दौऱ्यांची संख्या पाहता त्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती वाटत आहे. म्हणून, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी गिरीश महाजन यांना फोन करून ही सूचना दिली.

फडणवीस यांच्यासाठी चाहत्यांची प्रार्थना

देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतर भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांकडून फडणवीस यांच्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. तसेच Get Well Soon असे मेसेज लिहून फडणवीस यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. ट्विटर आणि फेसबुकवरुन नेटीझन्स आपल्या भावना व्यक्त करत आहे. तर, काहीजण फडणवीस यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन देत होते. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसरोहित पवारकोरोना वायरस बातम्याराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा