माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; उद्धव ठाकरे हिंदूजा रुग्णालयात भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 02:09 PM2023-05-23T14:09:08+5:302023-05-23T14:46:17+5:30

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत खालावल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Former CM Manohar Joshi admitted to hospital; Uddhav Thackeray left for Hinduja Hospital | माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; उद्धव ठाकरे हिंदूजा रुग्णालयात भेटीला

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; उद्धव ठाकरे हिंदूजा रुग्णालयात भेटीला

googlenewsNext

मुंबई- माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत खालावल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मनोहर जोशी यांच्या तब्येती संदर्भात विचारपूस करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे हिंदुजा रुग्णालयात दाखल झाले आहेत.

मनोहर जोशी यांना अस्वस्थ वाटत असल्याने  सोमवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

"तू स्टँप पेपर आण, मी लिहून देतो"; त्या प्रश्नावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

१९९५-९९ मध्ये राज्यातील पहिल्या शिवसेना-भाजप सरकारमध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, मनोहर जोशी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  सध्या त्यांच्या प्रकृतीशी संबंधित कोणतेही वैद्यकीय बुलेटिन जारी करण्यात आलेले नाही.

Web Title: Former CM Manohar Joshi admitted to hospital; Uddhav Thackeray left for Hinduja Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.