माजी नगरसेवकही उमेदवारीच्या शर्यतीत

By admin | Published: October 9, 2016 04:03 AM2016-10-09T04:03:41+5:302016-10-09T04:03:41+5:30

राजकीय कारकीर्द बहरत असताना ऐन उमेदीच्या काळात आरक्षणाने घात केला. यात काहींनी आपल्या पत्नी, बहीण व मुलीला निवडणुकीच्या रिंगणातून उतरवून आपली पत वाचवली.

Former corporators are also in the race for the candidature | माजी नगरसेवकही उमेदवारीच्या शर्यतीत

माजी नगरसेवकही उमेदवारीच्या शर्यतीत

Next

मुंबई : राजकीय कारकीर्द बहरत असताना ऐन उमेदीच्या काळात आरक्षणाने घात केला. यात काहींनी आपल्या पत्नी, बहीण व मुलीला निवडणुकीच्या रिंगणातून उतरवून आपली पत वाचवली. मात्र
काहींना तीदेखील संधी मिळाली नाही. तरीही पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या या माजी नगरसेवकांना आरक्षणाने मार्ग मोकळा केला
आहे. त्यामुळे माजी नगरसेवकही उमेदवारीच्या शर्यतीत असून
त्यांच्या प्रामाणिकतेचा दबाव त्या त्या राजकीय पक्षांवर आहे.
काही जण गेली पाच वर्षे तर काही दहा वर्षांपासून या संधीच्या प्रतीक्षेत आहेत. गेली पाच वर्षे प्रामाणिक राहून पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करीत त्याला जिंकून आणणाऱ्या या निष्ठावानांचा विचार त्या त्या राजकीय पक्षांनाही करावा लागणार आहे. यामुळे आजी आणि माजी नगरसेवकांमध्ये काही ठिकाणी जुंपली असून प्रत्येकाने पक्षातील आपले वजन वापरण्यास सुरुवात केली आहे. तर माजी नगरसेवकही निवडणूक प्रचारासाठी सक्रीय झाल्याने उमेदवारीचे दान कोणाच्या पदरात टाकावे, याचे
टेन्शन राजकीय पक्षांनाही असणार आहे. (प्रतिनिधी)

या माजी नगरसेवकांना मिळणार पुन्हा संधी
महादेव देवळे, दत्ता दळवी, भालचंद्र शिरसाट, जनक संघवी, प्रभाकर शिंदे, आशिष चेंबूरकर, प्रकाश आयरे, दिगंबर कांडरकर, राजुल पटेल, अनिता बागवे, विनोद शेखर, पुरण दोशी, गुणवंत सेठ, रवी राजा, अजित रावराणे, भारती पिसाळ.

भगवाच फडकणार
महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकणार असून, महापौरही शिवसेनेचाच असेल, असा विश्वास खासदार गजानन कीर्तिकर यांनी वर्सोवा येथे व्यक्त केला. कमला मेहता महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित समाजसेवक सचिन शिवेकर युवा मंचाच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी सचिन शिवेकर यांनी हजारो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. शिवेकर यांच्यासोबत प्रभाग क्रमांक ५९मधील मनसेच्या महिला उप शाखाध्यक्ष वर्षा नाईकरे, सीमा करंडे, सुनीता पऱ्हाड, गोरक्षनाथ पऱ्हाड, उप शाखाअध्यक्ष रवी करंडे, प्रकाश ठाकूर, सचिन कुदळे, बाबाजी हगवणे, संजय साबळे, अजिंक्य शिंदे, काँग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष रोहिदास बेंद्रे, दत्तात्रय सातपुते, राष्ट्रवादीचे सुरेश राळे तसेच हुसैन यंग कमिटीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी खा. शिवाजीराव आढळराव पाटील, सिनेअभिनेते रमेश देव, आमदार अनिल परब, आमदार सुरेश गोरे यांच्यासह राजगुरूनगर तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, उपविभागप्रमुख राजेश शेट्ये, उपविभागप्रमुख विष्णू कोरगावकर, महिला उपविभाग संघटक शीतल सावंत, विभाग अधिकारी सचिन नायक, शाखाप्रमुख अनिल राऊत, महिला शाखा संघटक बेबी पाटील हेही उपस्थित होते.

2012 मध्ये ५० टक्के महिला आरक्षण आले. या आरक्षणात अनेक दिग्गज गारद झाले. काहींचे पक्षाने पुनर्वसन केले खरे. तरीही निम्म्याहून अधिक दिग्गजांची राजकीय कारकीर्द थांबली. अशा वेळी अन्य राजकीय पक्षांमध्ये संधी शोधून अनेकांनी उड्या घेतल्या. या बंडखोरीच्या डोकेदुखीने सर्व राजकीय पक्ष धास्तावले. मात्र अशा काळातही काही जणांनी संधीपेक्षा पक्षाला मोठे स्थान दिले. या निष्ठवंतांसाठी २०१७ मधील आरक्षणाने पालिकेचे द्वार पुन्हा एकदा खुले केले आहे.


मनसे पदाधिकारी आपआपसांत जुंपले
1)पालिका निवडणुकांत उमेदवारी मिळावी म्हणून सर्वच पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावली असतानाच भांडुप विधानसभा मतदारसंघातील मनसेच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांमध्ये उमेदवारीसाठी अंतर्गत वाद उफाळून आले आहेत. त्यामुळे मनसेतील पक्षांतर्गत राजकारण येत्या काही दिवसांत तापणार आहे.
2)पालिकेच्या एस वॉर्डमध्ये येणाऱ्या भांडुप विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेच्या दोन महिलांसह एक पुरुष असे एकूण तीन नगरसेवक आहेत. हे नगरसेवक कार्यरत असलेल्या वॉर्डचे विभाजन होऊन दोन वॉर्ड खुले झाले. तर या विभागातील अन्य पाच वॉर्ड महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे खुल्या वॉर्डमधून मनसेच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. यात रूपेश वायंगरने यांनी उमेदवारी मागितलेली नाही. परंतु, ते महिलांसाठी असलेल्या विभागातून नातेवाइकांना उभे करण्याच्या तयारीत आहे.
3)तर दुसरीकडे दोन्ही नगरसेविका वैष्णवी सरफरे, अनिषा माजगावकर
यांनी अनुक्रमे ११५ आणि ११४ वॉर्डमधून आपली उमेदवारी कायम ठेवण्याचा हट्ट धरला आहे. तर ११५ वॉर्डमधून स्वयंघोषित शाखाध्यक्ष अनिल राजभोज आणि राजेश फडतरे यांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. तर नगरसेविका माजगावकर यांनी दुसऱ्या वॉर्डातून निवडणूक लढावी, असे सांगत मनसेचे भांडुप विधानसभा अध्यक्ष योगेश सावंत यांनी ११४ मधून आपल्या उमेदवारीचा दावा केला आहे.
4)महिलांसाठी पाच वॉर्ड
असताना त्यांनी त्या विभागातून प्रयत्न करणे उचित आहे. आम्हालाही संधी मिळणे गरजेचे असल्याचे अन्य उमेदवारांचे म्हणणे आहे. त्यामुळे महिला नगरसेविकांच्या हट्टाविरु द्ध मनसेचे पुरुष कार्यकर्ते उभे आहेत.
5)नगरसेविका अनिषा माजगावकर यांच्या म्हणण्यानुसार, ’आजवर मी या विभागात काम केले आहे. त्यामुळे माझ्याच विभागातून संधी मिळाल्यास मी निवडून येईन. त्यामुळे याच विभागात उमेदवारी मिळावी. अन्यथा पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य आहे. वैष्णवी सरफरे यांचेही हेच म्हणणे आहे.
6) त्यामुळे खुल्या झालेल्या दोन वॉर्डांमध्ये मनसेचे महिला आणि पुरुष कार्यकर्ते आमनेसामने झाल्याने पक्षनेतृत्व काय निर्णय घेणार याकडे भांडुपमधील मनसे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Former corporators are also in the race for the candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.