माजी नगरसेवकांना पदाचा मोह आवरेना! BMC बोधचिन्हाचा सर्रासपणे वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 10:44 AM2023-01-17T10:44:34+5:302023-01-17T10:44:45+5:30

लेटरहेड वापरून पोलिसांत तक्रार करणे हे बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८नुसार बेकायदेशीर आहे

Former councilors are not tempted by the post! Widespread use of the BMC emblem | माजी नगरसेवकांना पदाचा मोह आवरेना! BMC बोधचिन्हाचा सर्रासपणे वापर

माजी नगरसेवकांना पदाचा मोह आवरेना! BMC बोधचिन्हाचा सर्रासपणे वापर

Next

मुंबई : मुंबईतील नगरसेवकांची टर्म संपून वर्ष उलटायला आले, तरी माजी नगरसेवकांना नगरसेवकपदाचा मोह अद्याप आवरता आलेला नाही. पालिकेची मुदत संपूनही माजी नगरसेवकांकडून मुंबई महापालिकेचे बोधचिन्ह असलेल्या लेटरहेडचा सर्रास वापर केला जात आहे. 

७ मार्च २०२२ रोजी महापालिकेची मुदत संपली असून तेव्हापासून पालिकेचे कामकाज आयुक्त इकबाल सिंग चहल हे प्रशासक म्हणून पाहत आहेत. पालिकेची मुदत संपली तेव्हा नगरसेवकांचाही कार्यकाळ संपला;  मात्र अनेक नगरसेवक हे पालिकेचे लेटरहेड सर्रास वापरत आहेत. लेटरहेड वापरून पोलिसांत तक्रार करणे हे बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८नुसार बेकायदेशीर आहे. जून महिन्यात शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाने लेटरहेडचा वापर केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पालिकेचे बोधचिन्ह वापरता येईल की नाही, याबाबत पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना विचारले असता त्यांनी लेटरहेड वापरता येत नाही, असे सांगितले.

Web Title: Former councilors are not tempted by the post! Widespread use of the BMC emblem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.