विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात इस्रोचे माजी अध्यक्ष प्रमुख पाहुणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 06:25 AM2018-02-20T06:25:12+5:302018-02-20T06:25:28+5:30

मुंबई विद्यापीठाच्या गुरुवारी होणाºया २०१८च्या दीक्षान्त समारंभाला इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. किरण कुमार उप्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Former guests of the ISRO president, chief guest, at the university's convocation ceremony | विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात इस्रोचे माजी अध्यक्ष प्रमुख पाहुणे

विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात इस्रोचे माजी अध्यक्ष प्रमुख पाहुणे

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या गुरुवारी होणाºया २०१८च्या दीक्षान्त समारंभाला इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. किरण कुमार उप्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
डॉ. किरण कुमार यांना त्यांच्या अत्युच्च योगदानासाठी भारत सरकारने २०१४ साली पद्मश्री देऊन गौरविले. जवळपास चार दशकांपासून ते अंतराळ क्षेत्रात कार्यरत असून भास्कर, चांदयान-१, मंगळ मोहीम अशा अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. १५ फेब्रुवारी २०१७ या दिवशी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रोने विश्वविक्रमी १०४ उपग्रह एकाच वेळी अवकाशात प्रक्षेपित केले. हा ऐतिहासिक विक्रम इस्रोचे प्रमुख ए.एस. किरणकुमार यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या टीमने केला. अशा थोर शास्त्रज्ञाच्या हस्ते दीक्षान्त समारंभामध्ये १ लाख ८७ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल. डॉ. किरण कुमार यांच्यासारख्या थोर शास्त्रज्ञाच्या हस्ते पदवी स्वीकारताना विद्यार्थ्यांना अभिमान वाटेल, असे मत मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केले.

Web Title: Former guests of the ISRO president, chief guest, at the university's convocation ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.