Join us

माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे, काेरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे दोन डोस त्यांनी घेतले होते. अंधेरी पूर्वेतील क्रिटीकेअर रुग्णालयात काेराेनावरील उपचाराससाठी दाखल झाल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

डाॅ.दीपक सावंत यांनी १६ जानेवारी व १६ फेब्रुवारी, २०२१ रोजी कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतले होते. डाॅ.सावंत यांनी सांगितल की, महिन्याभरापूर्वी त्यांच्या शरीरात २६८ अँटिबॉडीज होत्या. लसीचे दाेन्ही डाेस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाल्याने बूस्टर डोस घेण्याच्या आवश्यकतेबाबत आयसीएमआरने निकष ठरवणे गरजेचे आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी डॉ.सावंत यांच्या प्रकृतीची चौकशी केली. डॉ.सावंत यांनी कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अभ्यासपूर्ण लिखाण केले आहे. गेल्या आठ दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करावी, अशी विनंती त्यांनी केली.

..................................................